दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. पक्षचिन्हासाठी शिंदे गट कोणते पर्याय देणार याची उत्सुकता, ठाकरे गटाच्या हाती मशाल, नावांवरही केंद्रीय निवडणूक आयोगाचं शिक्कामोर्तब
2. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट दिल्ली हायकोर्टात, धनुष्यबाण आणि शिवसेना नाव गोठवण्याच्या निर्णयाला आव्हान तर शिंदे गटाकडून कॅवेट दाखल
3. पवारांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडमध्ये मुदतीपूर्वीच विनापरवाना ऊसाचं गाळप, भाजपच्या राम शिंदेंचा आरोप, गुन्हे दाखल करण्याची मागणी
4. मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांचं संयुक्त पॅनल, अध्यक्षपदासाठी संदीप पाटील आणि शेलार यांच्यात सामना
5. अमरावतीत ईद-ए-मिलादनिमित्त वाजवण्यात आलेल्या गाण्यांवर आक्षेप, धार्मिक तेढ निर्माण करणारी गाणी वाजवल्याप्रकरणी 8 ते 10 जणांवर गुन्हा, परतवाडा पोलिसांकडून तपास
अमरावतीच्या परतवाडामध्ये काल धार्मिक तेढ निर्माण होईल अशा आशयाचं गाण वाजवल्याने 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. परतवाडामध्ये एक गट सर तन से जुदाच्या घोषणा देतानाचा व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय. ईद ए मिलादनिमित्त अमरावतीच्या ग्रामीण भागात मिरवणूक काढण्यात आल्यानंतर डीजेवर धार्मिक तेढ निर्माण करणारी गाणी वाजवण्यात आल्याचा आरोप होतोय.
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 11 ऑक्टोबर 2022 : मंगळवार
6. परतीच्या पावसामुळे चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याचं मोठं नुकसान, जवळपास 40 टक्के कांदा नासल्याने शेतकरी अडचणीत
7. अलमट्टीची उंची वाढवू नका अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, कोल्हापूरचा कर्नाटक सरकारला इशारा, महाराष्ट्राशी चर्चा करण्याचं कर्नाटक सरकारचं आश्वासन
8. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचाही ठाकरे गटाला पाठिंबा, ऋतुजा लटके आता महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून रिंगणात
9. मुंबईत डोळ्याची साथ, यंदा डोळे येण्याचं प्रमाण दहा टक्क्यांनी वाढल्याचं डॉक्टरांचं मत, संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन
10. महानायक बिग बी यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव, एबीपी माझा विविध कार्यक्रमातून उलगडणार अमिताभ यांचा जीवनपट