दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. शिवसेना भवनासमोर मनसेकडून हनुमान चालिसा पठण, मशिदीवरील भोंग्यांना विरोध करणाऱ्या शिवसेनेवर निशाणा


2. 2 वर्षांच्या कोरोना संकटानंतर आज देशभरात रामनवमीचा उत्सव, ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन, तर राज्यातील मंदिरं भाविकांनी गजबजली


3. आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना खासगी रुग्णालयात  बूस्टर डोस घेता येणार, लशीच्या किंमतीही घटल्या, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन आता 225 रुपयांना मिळणार


Corona Vaccine : देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. 10 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असतील.


कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या किमती घटवल्या
सीरम इन्स्टिट्यूकडून उत्पादित  करण्यात येणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीचे दर कमी करण्यात आली आहे. सीरमने खासगी रुग्णालयासठी कोव्हिशिल्डचे दर हे तब्बल 375 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कोव्हिशिल्डची लस आता  225 रुपयांना मिळणार आहे. सोबतच भारत बायोटेकच्या सुचित्रा एला यांनी  देखील खासगी रुग्णालयासाठी कोवॅक्सीनच्या किंमत कमी केल्या आहेत. कोवॅक्सीनची किंमत आता 1200 वरून 225 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


4. पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर 109 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आंदोलनाआधी पवारांच्या घराची रेकी केल्याची पोलीस सूत्रांची माहिती


5. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शायना एनसी राज ठाकरेंच्या भेटीला, ठाण्यातल्या 12 एप्रिलच्या सभेचा टीझरही प्रदर्शित 


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 10 एप्रिल 2022



6. आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना समन्स, अटकपूकर्व जामिनासाठी कोर्टात धाव,11 एप्रिलला सुनावणी


7. मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना दुसऱ्यांदा मुंबई पोलिसांची नोटीस, माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना


8. श्रीलंकेवर आर्थिक संकट, श्रीलंकेत लाखो तरुणांचं एल्गार, 'गो गोटा होम'च्या घोषणांनी परिसर दणाणला


9. पाकिस्तानातील इम्रान खान सरकार कोसळलं, इम्रान खान यांच्या विरोधात 174 मतांनी अविश्वास ठराव मंजूर, पाकिस्तानात मध्यरात्री नाट्यमय घडामोडी


10. पृथ्वीराज पाटील 2022 चा महाराष्ट्र केसरी, अंतिम सामन्यात विशाल बनकरवर 5-4 ने मात, 21 वर्षानंतर कोल्हापुरात मानाची गदा