1. वीजेची वाढलेली मागणी आणि कोळश्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळं उर्जा विभागासमोर मोठं संकट, वीज खरेदीच्या करारासाठी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक


2. मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांच्या जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी, देशमुख पितापुत्रच मास्टरमाईंड, ईडीचं शपथपत्र


3. राज्य मंत्रिमंडळातल्या फेरबदलासाठी हालचालींना वेग, आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष


4. मनसेचे कोकणातील एकमेव नगराध्यक्ष वैभव खेडेकर अपात्र म्हणून घोषित, डिझेल चोरी, नियमबाह्य कामांचा ठपका ठेवत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई


5. देशद्रोही सोमय्यांना जोडे मारा! भाजपचे पुरते वस्त्रहरण झाले; सामना अग्रलेखातून शिवसेनेचा टीकेचा बाण


Kirit Somaiya vs Sanjay Raut : मागील काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि ईडी असा सामना रंगला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर हे प्रकरण आणखीनच तापलं. शिवसेनेकडून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करण्यात आले. सोमय्या यांनी विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमा केलेले 58 कोटी रुपये हडपल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. आता सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. ‘देशद्रोही सोमय्यांना जोडो मारा’ या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचा बाण सोडण्यात आला आहे.


6. संजय बियाणी हत्याकांडांची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा नियमित आढावा घेणार


7. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून रशियाची हकालपट्टी, मतदानावेळी भारताची तटस्थ भूमिका, विरोधात मतदान करणाऱ्या देशांना पुतिन यांचा अप्रत्यक्ष इशारा


8. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून संसद बरखास्तीचा निर्णय रद्द, अविश्वास प्रस्तावाला सामोरं जाणाऱ्या इम्रान खान यांची अग्निपरीक्षा


9. 'देशाचा पुढचा पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठा जरुर बनेल', रॉचे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुल्लत यांचं वक्तव्य


10 . लखनौचा दिल्लीवर 6 विकेट्सने विजय, डी कॉकचं शानदार अर्धशतक; आज पंजाब-गुजरात भिडणार