दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.




1. शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनावेळी राऊतांच्या हातात माईक जाताच भाजप आमदारांचा काढता पाय, ईडीनं राऊतांवर केलेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडीचा हल्लाबोल


2. कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदला, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस आमदारांच्या बैठकीत खलबतं, मविआमध्ये काँग्रेसची कोंडी होत असल्याची भावना


3. मशिदीच्या भोंग्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानं राजकारण तापलं असतानाच राज ठाकरेंची 9 एप्रिलला ठाण्यात सभा, नाराज पदाधिकाऱ्यांबाबत काय भूमिका घेणार याकडेही लक्ष


4. राजापूरमधल्या रिफायनरीसंदर्भात आज जनतेचा कौल कळणार, धोपेश्वरमध्ये मतदानाचं आयोजन, दोन्ही गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी


5. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेड बंदची हाक, मारेकऱ्यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 06 एप्रिल 2022 : बुधवार : एबीपी माझा



6. तरुणींच्या मदतीनं ओडिशामधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांचाही हात, नागपुरातील पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला अटक


Nagpur Crime News : नागपुरात इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली तरुणींना अंमली पदार्थांची तस्करी करायला लावणाऱ्या टोळीचं आता पोलीस कनेक्शन समोर आलं आहे. तरुणींच्या मदतीनं ओडिशामधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांचाही हात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. याप्रकरणी नागपुरातील पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. 


नागपुरात इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली तरुणींना अंमली पदार्थांची तस्करी करायला लावणाऱ्या टोळीचं आता पोलीस कनेक्शन समोर आलं आहे. याप्रकरणात अटकेत असलेल्या अभिषेक पांडे आणि सोनू ठाकूर या आरोपींनी पोलिसांना त्यांच्या अन्य साथिदारांची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य तीन आरोपींनाही अटक केली आहे. यातील आरोपी रामसिंह मीणा हा रेल्वे सुरक्षा दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तर, 23 वर्षांचा कुश माळी हा आरोपी पोलीस कर्मचार्‍याचा मुलगा आहे. या ड्रग्ज तस्कारी प्रकरणात पोलिसांचा सहभाग समोर आल्यानं नागपुरात आता एकच खळबळ उडाली आहे. 


7. अवघ्या पाच दिवसांत सीएनजी 7 रुपयांनी तर पीएनजी 5 रुपयांनी महाग, व्हॅटमध्ये 3 टक्के कपात करूनही गॅसच्या किमती, रिक्षा-टॅक्सी चालकांकडून प्रवासी भाडे वाढवण्याची मागणी


8. राज्यात पुढील चार दिवस तिहेरी वातावरण, कोकणात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उकाड्यासह पावसाची शक्यता


9. मुंबईतील रस्त्यांवर थुकणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, महापालिकेकडून लवकरच  'उपद्रव शोधक' पथकाची नियुक्ती, अस्वच्छता करणाऱ्यांवरही बडगा उगारणार


10. श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर आंदोलनाची धग राष्ट्रपतींच्या घरापर्यंत, रातोरात आणीबाणी हटवण्याचा निर्णय, राष्ट्रपती पायउतारण होणार का याकडं लक्ष