दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. 2017च्या प्रभाग रचनेप्रमाणेच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारचा मविआला मोठा धक्का
2. 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्ताराची दाट शक्यता, सुरुवाीला शिंदे गटाचे सात तर भाजपचे 8 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार
3. आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईचा अधिकार विधानसभाध्यक्षांना की कोर्टाला? सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी, बंडखोरांनी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केलं की नाही यावरही खल
4. पीएमएलए कोर्टानं सुनावलेली कोठडी संपत असल्यानं संजय राऊतांना पुन्हा कोर्टात हजर करणार, कोठडी वाढवून देण्याची ईडी मागणी करणार, तर राऊत जामिनाच्या प्रतीक्षेत
5. गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या अपघातानंतर ग्रामस्थांचा हल्ला, मध्य प्रदेशातील नर्मदापुरममधील घटनेत अमरावतीच्या एकाचा मृत्यू, दोघे जखमी
6. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून 7 हजार 880 बोगस शिक्षकांची नाव जाहीर, 2019 मधल्या टीईटी परीक्षेतील घोटाळा प्रकरणी अपात्रतेची कारवाई
Maharashtra TET Exam Scam : राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam Scam) झालेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी होत चालली आहे. परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी 7 हजार 880 उमेदवारांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असू शकते. 2019 साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत तब्बल 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या (Pune Cyber Police) तपासात उघड झालं होतं. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली असून त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. या 7800 विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे.
7.राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, पुढील तीन दिवस पावसाचा इशारा, मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस
8.यंदा उसाला मिळणार 3 हजार 50 रुपयांची FRP, पाच कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा
9.पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; दर 15 दिवसांनी इंधनांवरील नवीन कराचा आढावा घेणार
10. भारतानं अठरावं पदक जिंकलं! तेजस्वीन शंकरची ऐतिहासिक कामगिरी, हाय जंपमध्ये कांस्यपदक जिंकून रचला इतिहास!