दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


1. शिवाजीपार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिका कुणाला परवानगी देणार याची उत्सुकता शिगेला, शिंदे गट आणि राज ठाकरे एकत्र मेळावा घेणार असल्याच्या चर्चा


2. गृहमंत्री अमित शाहा मुंबई दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता, नव्या समीकरणाची चर्चा तर आशिष शेलारांनी शाह-ठाकरे भेटीचं वृत्त फेटाळलं


3. अशोक चव्हाणांची भेट झाल्याच्या चर्चांना स्वतः फडणवीसांकडून पूर्णविराम, भारत जोडोसंदर्भातल्या बैठकीसाठी अशोक चव्हाण आज दिल्लीत


4. महिलेला मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याची पदावरून हकालपट्टी, पत्रक जारी करत घडलेल्या प्रकारावर मनसेचा माफीनामा, राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल


मुंबईतील नागपाडा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिन्ही मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे. नागपाडा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमनातून संताप व्यक्त केला जात होता.  


पोलिसांनी सांगितले की, आरोपी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यासाठी पीडित महिलेच्या दुकानासमोर बांबू लावत होता. त्याला पीडित महिलेने विरोध केला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पीडित महिलेशी धक्काबुक्की केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत: महिलेशी संपर्क साधला आणि पोलिस ठाण्यात तिचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. आरोपी विनोद अरगिळे, राजू अरगिळे, संदीप लाड यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


5. सिन्नरमधील पूर ओसरण्यास सुरुवात, शेती वाहून गेल्यानं बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत, अनेक घरांचंही नुकसान


पाहा व्हिडीओ :  स्मार्ट बुलेटिन : 03 सप्टेंबर 2022 : शनिवार



6. यवतमाळच्या शेतकरी पुत्राची ग्रामहित कंपनी फोर्ब्सच्या यादीत, शेतकऱ्यांचं आर्थिक हित जपणाऱ्या महल्ले दाम्पताच्या पाठीवर कौतुकाची थाप


7. पुण्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गडकरींचा मेगा प्लॅन, चांदणी चौकातला पूल दोन-तीन दिवसांत पाडणार तर हवेतली बस सुरु करण्याचीही घोषणा


8. उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये गणेशपूजा करणाऱ्या मुस्लिम महिलेविरोधात मौलवींचा फतवा, उग्रवादीची उपमा देत महिलेचाही पलटवार


9. आज घरोघरी गौराईचं आगमन, पाहुणचारासाठी महिला वर्गाची लगबग


10. संपूर्ण जगाला मेक इन इंडियाचं दर्शन, स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलात दाखल, भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण