दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


1. कोरोना काळातील मर्यादा शिथिल केल्यानं शंभर टक्के नोकरभरतीचा मार्ग मोकळा, स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सर्व रिक्त पदं भरणार


2. ट्विटरच्या व्हेरिफाईड अकाऊंटसाठी जवळपास सहाशे साठ रुपये मोजावे लागणार, एलन मस्क यांची घोषणा, ट्विटरवर आता मोठे व्हीडिओही पोस्ट करता येणार


एलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच महत्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे. आता ट्विटरवर ब्लू टिक घेणाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. यासाठी ट्विटरवर ब्लू टिक सबक्रिप्शनचा पर्याय देण्यात येणार आहे. ब्लू टिकसाठी प्रतिमहिना 8 डॉलर म्हणजेच, 661 रुपये इतकी किंमत ठेवण्यात आली आहे. सध्या असणारी ब्लू टिक सिस्टिम दर्जाहीन असल्याचं एलन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलेय. त्यामुळे ब्लू टिक असणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.


एलन मस्क यांनी ट्विटरचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यापासून केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर वापरकर्त्यांसाठीही बरेच काही बदलू शकते, असे संकेत मागच्या काही दिवसांत वेळोवेळी त्यांनी ट्वीट करून दिले होते. त्याचाच भाग म्हणून त्यांनी ब्लू टिकसाठी पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 


3. एकनाथ शिंदेंना साथ देणाऱ्या 40 आमदारांच्या मतदारसंघावर ठाकरे गटाचं विशेष लक्ष, बंडखोरांना पराभूत करण्यासाठी विशेष रणनीती तयार


4. दहा दिवसांत टोमॅटोचे दर थेट 80 रुपयांवरुन 25 ते 30 रुपयांच्या घरात, शेतकऱ्यांना आर्थिक फटका, तर किरकोळ बाजारात गव्हाच्या दरात 4 ते 5 रुपयांची वाढ


सध्या राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी (Farmers) अडचणीत आला आहे. कारण सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे. 80 रुपयांवरुन टोमॅटोचे दर थेट  25 ते 30 रुपयांवर आले आहेत, त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या टोमॅटोची निर्यातही मंदावली आहे. त्यामुळे दहा दिवसांत दर जवळपास निम्म्यावर आले आहेत.


सध्या बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. त्यामुळं टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे.  80 रुपयांवरुन टोमॅटोचे दर हे थेट 25 ते 30 रुपयांवर आले आहेत. टोमॅटोचे दर आणखी गडगडण्याची शक्यता आहे. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आणखी आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून राज्यात टोमॅटोची आवक होत आहे. त्यामुळं दर घसरत आहेत. 


5. रत्नागिरीतील बारसूमध्ये रिफायनरीसाठी हालचालींना वेग, पुढील आठवड्यात अधिकृत घोषणेची शक्यता तर रिफायनरीविरोधी आंदोलकांना तडीपारीच्या नोटीसा


6. महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनवरुन वाद, रामदास तडसांच्या अध्यक्षतेखालील नव्या कुस्तीगीर परिषदेकडून स्पर्धा भरवण्याची तयारी तर आपणच स्पर्धा भरवणार, बाळासाहेब लांडगेंचा पवित्रा


7. म्हाडाच्या घरांच्या  लॉटरीसाठी अनामत रक्कम वाढवणार? घराच्या किंमतीच्या 5 ते 10 टक्के रक्कम आकारण्याचा विचार


8. कोल्हापुरात वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहारच्या घरी 5 तास झाडाझडती, तर सोलापूर न्यायालयाकडून किरण लोहारला दोन दिवसांची पोलीस कोठडी


9. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 57 वा वाढदिवस, शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी मन्नतबाहेर मध्यरात्री चाहत्यांची गर्दी


10. टी-20 विश्वचषकाची उपांत्यफेरी गाठण्यासाठी टीम इंडिया मैदानावर उतरणार, मेन इन ब्लू बांग्लादेशशी भिडणार