दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाच्या नेतेपदावरून हटवलं. पक्षाविरोधात बंड केल्यानं शिवसेनेची कारवाई, तर शिंदेंना मिळालेला मान त्यापेक्षा मोठा, कारवाईवर केसरकरांचं प्रत्युत्तर


मुंबई : शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्यावर  कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत भर पडली आहे. पक्षाने थेट एकनाथ शिंदे  यांची शिवसेनेच्या नेते पदावरून  काढले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे पत्र जारी केलं आहे. पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात शिवसेनेने मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षने नेतेपदावरून काढण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं. शिवसेनेचे 39 आमदार त्यांच्यासोबत आहेत. यानंतर शिंदे गटानं पक्षावरच दावा सांगितला. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा उल्लेख शिवसेनेनं शिंदेंना पाठवण्यात आलेल्या पत्रात केला आहे.


2. उद्या आणि परवा होणाऱ्या अधिवेशनासाठी गोवा मुक्कामी असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार, बंडखोरांसाठी मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था
 
3. शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यपाल नियुक्त जागांसाठी नव्या नावांची यादी पाठवली जाणार, मविआ सरकारची यादी राज्यपालांकडेच पडून
 
4. विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज दुपारी 12 पर्यंत मुदत, भाजपकडून राहुल नार्वेकरांचा अर्ज तर महाविकास आघाडीचा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता


5. ओबीसी आरक्षणाचा दोषविरहित अहवालासाठी प्रयत्न, बैठकीनंतर फडणवीसांची माहिती तर योग्य वेळेत डेटा मिळेल, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास 


6. मी पुन्हा येईल... पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी काल 10 तास चौकशी झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया, चौकशीत आवश्यक सर्व माहिती दिल्याचा दावा
 
7.फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले हा सर्वात धक्कादायक क्लायमॅक्स; शिवसेनेची सामनातून टोलेबाजी


8. पुढील 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट, मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरही मुसळधार
 
9.नवं सरकार स्थापन झाल्यानंतर बैठकांचा धडाका, आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत रेल्वे आणि दरड प्रवण ठिकाणांचा आढावा, यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश


10. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत ऋषभ पंतची शतकी खेळी आणि रविंद्र जडेजाच्या नाबाद 83 धावांच्या खेळीमुळे भारताचा डाव सावरला, पहिल्या दिवसअखेर भारताची 338 धावांची मजल