दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...




1. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सलग सुनावणी होणार की नाही याचं चित्र आज स्पष्ट होण्याची शक्यता, घटनापीठासमोर युक्तीवादासाठी दोन्ही गटाच्या वकिलांच्या फौजा सज्ज


2. पायलट प्रोजेक्टच्या स्वरुपात डिजिटल रुपीचा वापर सुरु, आजपासून कारमध्ये मागे बसणाऱ्यांसाठी सीटबेल्ट अनिवार्य, अन्यथा कारवाई, तर मुंबई- मांडवा वॉटर टॅक्सीसाठीही आजचाच मुहूर्त


3. प्रकल्प मविआच्या काळातच राज्याबाहेर, फडणवीसांचा आरोप, आदित्य ठाकरेंनी आरोप खोडून काढले, महाराष्ट्र कुठे कमी पडतो, मुख्यमंत्र्यांनी सांगावं, शिवसेनेचं आव्हान


एकामागून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. यावरूनच आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केलं आहे. तब्बल 1 लाख 66 हजार कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने काय प्रयत्न केले याची संपूर्ण टाइमलाईन आदित्य ठाकरे यांनी सांगितली आहे. महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी काय प्रयत्न केला.


4. मोदी सरकारचं महाराष्ट्राला 2000 कोटींच्या उद्योगांचं गिफ्ट, मविआ काळातील उद्योगांबाबत श्वेतपात्रिक काढा, भाजपची मागणी, प्रत्येक उद्योग गुजरातलाच कसा जातो?, राज यांचा सवाल


5. कार्तिकीसाठी पायी निघालेल्या कोल्हापुरातल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला, दिंडीत कार घुसल्याने 8 वारकऱ्यांचा मृत्यू, सोलापुरातल्या सांगोल्यात भीषण अपघात


6. मै झुकेगा नही, राणांच्या दिलगिरीवर भूमिका व्यक्त करण्यापूर्वी बच्चू कडू समर्थकांचे बॅनर, सरकारमध्ये, बाहेरून पाठिंबा की तटस्थ राहणार याचा सस्पेन्स 


7. सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षण अधिकारी किरण लोहार अटकेत,  25 हजाराची लाच घेताना जाळ्यात, डिसले गुरुजींवर केलेल्या आरोपामुळे चर्चेत


8. मुंबईत कारमधल्या मागच्या सीटला बेल्ट लावण्यासाठी मुदतवाढ, आजपासून फक्त समज दिली जाणार, 11 नोव्हेंबरपासून होणार दंडात्मक कारवाई 


सुरक्षित प्रवासासाठी मुंबईकरांवर आज मंगळवारपासून वाहतुकीच्या आणखी एका नियमाची सक्ती करण्यात येणार आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट (SeatBelt)  लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर मंगळवारपासून दंडात्मक कारवाई न करता केवळ वाहतूक पोलिसांकडून कडक समज' देण्यात येणार आहे. तर सीटबेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.  मात्र लोकांमध्ये अद्याप सीट बेल्ट संदर्भात जनजागृती नसल्याने सीटबेल्टसाठी मुदत आणखी वाढवण्यात आलेली आहे


9. मोरबी पूल दुर्घटनास्थळी पंतप्रधान भेट देणार, मोदींच्या दौऱ्यापूर्वी रुग्णालयाच्या रंगरंगोटीवरुन विरोधकांचा हल्लाबोल


10. न्यूझीलंड, बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे तीन वेगवेगळे कर्णधार, बुमराह आऊट, जाडेजाचं कमबॅक तर संघनिवडीवरुन काही क्रिकेटपटूंची सोशल मीडियावर स्टेटस ठेवून उघड नाराजी