मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर टोलवसुली बंद करण्यात आली होती. आज मध्यरात्रीपासून ही टोलवसुली माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी याविषयीची अधिसूचना जारी केली आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानुसार 29 मार्चच्या मध्यरात्रीपासून टोलवसुलीला स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती रद्द करण्याच्या सूचना आता देण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या आहेत.



Toll Collection | 20 एप्रिलपासून टोल वसुली चालू होणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आदेश जारी


राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोलनाक्यांवर 20 एप्रिलपासून टोल वसुली सुरु करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आले आहेत. शुक्रवारी, 17 एप्रिल रोजी प्राधिकरणाने हे आदेश जारी केले असून या आदेशानुसार आता देशभरातील टोलनाक्यांवर खासगी तसेच व्यावसायिक वाहनांकडून टोलवसुली सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



टोलमाफीचा निर्णय रद्द करा, आरटीआय कार्यकर्त्याची पंतप्रधानांकडे तक्रार


प्राधिकरणाच्या आधीच्या निर्णयानुसार 15 एप्रिलपासून ही टोलवसुली सुरु करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे 15 एप्रिलला पुन्हा टोल माफ करण्यासंदर्भातील अधिसूचना काढली होती.


CM Uddhav Thackeray UNCUT | राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना परवानगी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे