Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद
आज किरीट सोमय्या एसआरए घोटाळ्याची कागदपत्रे प्रसिद्ध करण्यासाठी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
रॉबर्ट वाड्रा शिर्डी आणि सिद्धिविनायक दर्शनाला
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आज शिर्डीच्या दर्शनाला सकाळी 11 वाजता आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दुपारी दीड वाजता जाणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात मेळावा
राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात मेळावा होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.
संभाजीराजे छत्रपती नाशिक दौऱ्यावर
संभाजीराजे छत्रपती नाशिक दौऱ्यावर आहेत. गाव तेथे शाखा व घर तेथे स्वराज्य अभियानांतर्गत छत्रपती संभाजीराजे सकाळपासून ईगतपुरी तालुक्यात 26 शाखांचे उदघाटन करणार आहेत.
नाशिकमध्ये छटपूजेचे आयोजन
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर रामकुंड परिसरात छठपूजेचे आयोजन करण्यात आले असून संगीत कार्यक्रम देखील पार पडणार आहे. जवळपास ३० हजार भाविक हजेरी लावतील असा आयोजकांनी अंदाज व्यक्त केलाय, संध्याकाळी ५.३० वाजता.
अंबादास दानवे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते कैलास पाटील यांचीही भेट घेणार आहेत.
खासदार विनायक राऊत रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरच्या दौऱ्यावर
खासदार विनायक राऊत आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरच्या दौऱ्यावर आहेत. एक दिवसीय दौऱ्यात राऊत संगमेश्वर तालुक्यातील दोन ठिकाणी विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
मन की बात
पंतप्रधान मोदी आज मन की बात करणार आहेत. सकाळी 11 वाजता मन की बात का कार्यक्रम होईल.
महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पाची आज गुजरातमध्ये मोदींच्या हस्ते पायाभरणी
आज दुपारी अडीच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी वायुसेनेच्या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची (manufacturing plant) पायाभरणी करतील. वडोदरा येथे सी २९५ मिलिट्री ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची निर्मिती होणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना
टी- 20 विश्व चषकात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना होणार आहे. दोन सामने जिंकत भारतीय संघ आपल्या गटात पहिल्या स्थानावर आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरू होणार आहे.