मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


लाऊडस्पीकर उतरवा अन्यथा 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, राज ठाकरेंचा इशारा


मशिदीवरचे भोंगे उतरत नसतील तर अजिबात शांत बसू नका! असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकून घेणार नसल्याचं राज ठाकरेंनी म्हंटलंय. औरंगाबादेत आज राज ठाकरेंची सभा झाली. सभेला राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.. मशिदीवरील भोंग्यांना अल्टिमेटमची आठवण करुन देताना राज ठाकरेंनी एकदा होऊनच जाऊ द्या असं म्हंटलंय.


राणा दाम्पत्याच्या भवितव्याचा आज फैसला


राणा दाम्पत्याच्या भवितव्याचा आज फैसला आहे. मुंबई सत्र न्यायालय राणांच्या जामीन अर्जावर आज आपला निकाल जाहीर करणार आहे. राणा दांम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार होते. मात्र शिवसेनेच्या विरोधानंतर त्यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं. शनिवारी (23 एप्रिल) पोलीसांनी राणा यांच्या खार निवासस्थानातून त्यांना ताब्यात घेतलं.  युवासेनेनं राणांच्य़ा घराविरोधात आंदलन केलं होतं. खा.नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहे. 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना 24 एप्रिल 2022 रोजी वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.  राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब आणि शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली. शनिवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. आमदार रवी राणा विरोधात 17 तर खासदार नवनीत राणांविरोधात सहा केसेस आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांचा या जामीनाला विरोध.


 गणेश नाईक आज हायकोर्टाचं दार ठोठावणार?


ठाणे सत्र न्यायालयानं दिलासा नाकरल्यानंतर भाजप आमदार गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. एका महिलेनं त्यांच्यावर प्रदीर्घ कालावधीच्या संबंधांनंतर लावला आहे बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. 


औरंगाबाद पोलीस आयोजकांवर कारवाई करणार का?


औरंगाबाद  पोलीस सोमवारी राज ठाकरेंच्या भाषण ऐकणार आहे. त्यानंतर ठाकरेंच्या सभेत अटी पाळल्या की नाही , याची माहिती घेऊन आयोजकांवर कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर


आजपासून  पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी, डेन्मार्क  आणि फ्रान्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहे.  


कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने


आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताच्या संघ आठव्या क्रमांकावर आहे. तर, राजस्थानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच आव्हान टिकवण्यासाठी कोलकाताच्या संघाला राजस्थानविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखवण्याची गरज आहे. तर, पुढील दोन सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याचं राजस्थानच्या संघाचा प्रयत्न असेल.


आज इतिहासात 


1920 : शास्त्रीय आणि नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म. 


1921 : ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म


1975 : चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी आणि गीतकार शांताराम आठवले यांचे निधन


1998 : गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते  पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन