मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
सोनिया गांधींची आज पुन्हा चौकशी
सोनिया गांधींची आज तिसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहण्याची शक्यता आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी (Sonia Gandhi) ईडीसमोर (ED) हजर होण्याची ही तिसरी वेळ आहे. सोनिया गांधी काल सहा तासांनंतर सोनिया ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या. आज त्या पुन्हा चौकशीसाठी हजर राहणार आहे.
संजय राऊत यांची पुन्हा चौकशी
संजय राऊत यांची आज पुन्हा ईडी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. मात्र ते चौकशीसाठी जाणार नाहीत.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मला भेट द्यायचीच असेल, तर सदस्य नोंदणीच्या अर्जांचे गठ्ठे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे द्या, असे भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले आहे. कोरोना काळानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. तसेच एकानाथ शिंदेंच्या बंडानंतर हे एकप्रकारे शक्तीप्रदर्शन असणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा भाग
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा पार्ट आज येणार आहे. यात ते पुन्हा एकदा भाजपा शिंदे गटावर निशाणा साधण्याची शक्यता आहे. याला भाजप नेमकं काय उत्तर देत हे पाहणं महत्त्वाचं आहे.
राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक
राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक आहे. मागील बैठकीत महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय फिरवले होते. त्यामुळे या बैठकीत काही निर्णय होतोय का? याकडे सर्वांचं लागलंय. मंत्रालयात 12 वाजता बैठक पार पडेल.
महागाईविरोधात आजही विरोधी पक्षाकडून गोंधळ
महागाई आणि लोकसभा, राज्यसभेतील निलंबित खासदारांच्या मुद्द्वावरुन आजही विरोधी पक्षाकडून गोंधळ सुरुच राहील. याबाबत मल्लिकार्जुन खडगे यांच्या कार्यालयात विरोधी पक्षांची बैठक होणार आहे
भारत आणि वेस्ट इंडीज सामना
भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना (3rd ODI) उद्या (27 जुलै) खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली असून आजचा सामना जिंकून भारत विंडीजला व्हाईट वॉश देऊ शकतो. मालिकेतील पहिला सामना भारताने 3 धावांनी तर दुसरा सामना 2 विकेट्सनी जिंकला होता.