Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


दिवाळी पाडवा आणि भाऊबीज
आज दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज साजरी केली जाणार आहे. संपूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पाडव्यानिमित्त व्यापारी आपल्या हिशोबाच्या वह्यांचे पूजन करता. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून दिवाळी पाडव्याकडे पाहिले जाते. भाऊबीजनिमित्त बहिण आपल्या भावाला ओवाळते. त्यानंतर भाऊ बहिणीला खास भेट म्हणजे ओवाळणी देतो. 


नेत्यांचं पाडवा, भाऊबीज सेलिब्रेशन 
 
बारामतीत गोविंद बागेत दिवाळीच्या पाडव्याला पवार कुटुंबीय कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी लोकांना भेटतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्य उपस्थितीत असतात. सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत का कार्यक्रम पार पडणार आहे. 
 
कोल्हापुरात गुळाचे सौदे होणार 
 
कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मार्केट यार्डमध्ये गुळाचे सौदे होणार आहेत. या सौद्यामध्ये गुळाला किती दर मिळणार यावर पुढील दर अवलंबून असतात.


मुंबईत रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची भाऊबीज 
 मातोश्री सामाजिक संस्थेद्वारे एक सामजिक बांधिलकी म्हणून उद्या अनाथ आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची भाऊबीज करण्यात येणार आहे. तसेच त्यांना उपयोगी साहीत्य देण्यात येणार आहे 
 
 इंदापुरात स्वप्नील सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश 
 इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.


 सांगलीत किल्ल्याच्याच्या प्रतिकृचे उद्घाटन 
 कवलापूर मध्ये रायगड किल्ल्याच्याची प्रतिकृती बनवली असून त्याच उद्घाटन आहे. 55 फूट बाय 35 फूट किल्ला बनवला आहे. राज्यातील सर्वात मोठा किल्ला आहे.


 गणपतीपुळ्यात दीपोत्सव  
दिवाळी पाडव्यानिमित्त प्रसिद्ध गणपतीपुळ्यात संध्याकाळी ७ वाजता दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासूनची ही परंपरा तितकाच भक्तिभावानं जपली जाते आणि उत्साहात साजरी केली जाते. दीपोत्सवही साजरा केला जाईल. 


मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार


काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज पक्ष मुख्यालयात जाऊन पदभार स्वीकारणार आहेत. सकाळी 8 वाजता-  खर्गे राजघाट, शांतिवन, विजय घाट, शक्ति स्थल, वीर भूमि और समता स्थळावर जाणार आहेत.  सकाळी 10.30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. सोनिया, राहुल, प्रियांका गांधी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता सोनिया गांधी आणि खर्गेंचं भाषण होईल.


टी-20 विश्वचषकात भारतीय संघ आज नेदरलँड्सविरुद्ध लढत देणार 


टी-20 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघ आज (27 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरुद्ध या स्पर्धेतील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघानं आतापर्यंत नेदरलँड्सशी टी-20 मध्ये खेळलेला नाही. बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सच्या संघाला 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारताविरुद्ध नेदरलँड्सचा संघ कशी कामगिरी बजावतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.