मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


एकनाथ शिंदेंसह सेनेच्या 35  आमदारांचं बंड तीव्र, सूरतहून गुवाहाटीला  एअरलिफ्ट


राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारविरोधात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 35  आमदारांचं बंड आणखी तीव्र होताना दिसतंय. कारण या आमदारांना सुरतहून आता गुवाहाटीला नेण्यात येणार आहे. बंडाचं निशाण फडकावणारे शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ 35 आमदारांचाच नाही, तर 40  आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती एबीपी माझाच्या मिळाली आहे


भाजपने राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना दिली उमेदवारी


भारतीय जनता पक्षाने (BJP) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.


डेक्कन क्वीन एक्सप्रेस धावणार नव्या रुपात


भारतातील वैशिठ्यपूर्ण महत्त्वाच्या ट्रेनपैकी एक असलेली 'डेक्कन क्वीन गेली 92 वर्षे प्रवशांच्या सेवेत आहे.  डेक्कन क्वीन ही भारतातील एकमेव गाडी आहे ज्यात डायनिंग कारची सुविधा आहे. म्हणजेच धावत्या ट्रेनमध्ये बसून आपण गरम गरम पदार्थ ऑर्डर करून घेऊ शकतो.आजपासून  ही नवीन गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.


माऊली आणि तुकोबांची पालखी आज पुण्यात मुक्कामी 


ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांनी आळंदी आणि देहूमधून प्रस्थान केले आहे  आज दोन्ही पालख्या पुणे मुक्कामासाठी मार्गक्रमण करणार आहेत. 22  जूनला संध्याकाळी माऊली आणि तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी पोहोचेल. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर 24  जूनला दोन्ही पालख्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतील.