मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


ठाणे पोलिसांकडून केतकी चितळेला अटक


 शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांकडून  केतकी चितळेला अटक करण्यात आली  आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. 


त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचा शपथविधी


त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदावर माणिक साहा यांची वर्णी लागलीय. बिप्लब देव यांनी आज त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत प्रतिमा भौमिक, माणिक साहा आणि जिष्णू देव वर्मा यांची नावं आघाडीवर होती..अखेर माणिक साहा यांच्या नावावर भाजप पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर माणिक साहा उद्या सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.


 देवेंद्र फडणवीसांची सभा


शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय सभा होतं आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपने  बुस्टर सभा घेतली होती. आता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. उद्या ( 15 मे)  भाजपने सभेचे आयोजन केले आहे. ही सभा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार असल्याचे भाजपकडून  सांगण्यात येत आहे.


गुजरातमध्ये आम आदमीची परिवर्तन सभा


गुजरातमध्ये आम आदमी पक्षाची परिवर्तन सभा होणार आहे. 182 विधानसभा मतदार संघात 20 दिवस ही सभा सुरू राहणार आहे


भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त  राजीव कुमार पदभार स्वीकारणार


 भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे आज (15 मे) रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेणार आहे


फास्टफूडमधील लोकप्रिय ब्रँड असलेल्या मॅकडॉनल्डची सुरूवात


फास्टफूडमध्ये लोकप्रीय ब्रँड असलेल्या मॅकडॉनल्ड या फूड जॉईंटचे देखील कोट्यवधी ग्राहक चाहते आहेत. मॅकडॉन्लडची सुरूवात 15 मे ला झाली होती. रिचर्ड आणि मॉरिस मॅकडॉन्लड या दोन भावंडानी कॅलिफोर्नियाच्या सॅन बर्नार्डीनो येथे 15 मे 1940 सुरूवात केली. आज 100 पेक्षा अधिक देशात 35,000 पेक्षा जास्त आउटलेट आहे.


आयपीएलमध्ये आज डबल डोस 


आज आयपीएलच्या मैदानात डबल धमाका आहे. दुपारी चेन्नई आणि गुजरातचा संघ समोरा समोर येणार आहे.. तर संध्याकाळी साडेसात वाजता लखनौ आणि राजस्थान यांच्यातील सामना होणार आहे. राहुल आणि संजू यांच्यात ब्रेबॉनच्या मैदानावर लढत होणार आहे. तर धोनी आणि हार्दिक यांची लढत वानखेडेच्या मैदानावर असेल.


आज इतिहासात


1817 - देवेंद्र नाथ टागोर यांचा जन्म


1923 - भारतीय विनोदी अभिनेता जॉनी वॉकरचा जन्म


1967 - बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा जन्म


1993 - देशाचे पहिले आर्मी कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन


1995 - एलीसन गारग्रीब्स एव्हरेस्टवर विना ऑक्सिजन जाणारी पहिली महिला