LIVE UPDATES | राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान यांची नावं निश्चित
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
28 Feb 2020 10:56 PM
चंद्रपूर शहरातील बागला चौकात असलेल्या मुरलीधर बागला कॉन्व्हेंट शाळेतील 15 विद्यार्थिनींना केक खाल्ल्याने विषबाधा, वाढदिवसानिमित्त शाळेच्या बाहेरील परिसरातून आणला होता केक
नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील 14 विद्यार्थ्यांनींचे विनयभंग केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली असून सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅम्प्युटर शिकविण्यासाठी आलेल्या शिक्षकाने मनपा शाळेतील विद्यार्थींनींचा विनयभंग केला होता. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपी शिक्षक लोचन परूळेकरला अटक करण्यात आली. मनपा शाळेतील सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतलाय.
पलूस येथील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप आनंदराव वेताळ (वय 54) यांच्यावर झालेल्या गोळीबारा प्रकरणी सुरज सुधाकर चव्हाण रा.डफळापूर या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी चव्हाण हा 2017 मध्ये मध्ये वेताळ यांच्या फौड्रीमध्ये काम करत होता. यावेळी त्यांच्या मध्ये पैशाचा वाद झाला होता. या पैसे घेणे देणे च्या वादातुन कामगारानेच गोळी झाडली असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. या अनुषंगाने पोलिसानी अधिक तपास केला आणि जत तालुक्यातील डफळापुर मधून आरोपीस ताब्यात घेतले. गुरुवारी दुपारी दुचाकीवरून येऊन वेताळ यांच्यावर गोळीबार केला होता.
गाडीची काच फुटून गोळी चालक बाजूच्या सीटमध्ये घुसल्याने श्री. वेताळ हे थोडक्यात बचावले होते. भर दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील कैद्याने खाल्ले खिळे, हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या विजय सुर्वे या कैद्याने नातेवाईकांना भेटू न दिल्याने खिळे गिळले, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल
राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान यांची नावं निश्चित
,राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी होणार निवडणूक,
महाविकास आघाडी एकत्र लढणार निवडणूक,
विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात,
चार पैकी दोन जागा राष्ट्रवादीला आणि एक शिवसेना, एक जागा काँग्रेसला
‘अवाढव्य ब्रम्हांडात राहूनही मनुष्याने ज्ञान मिळवल्यामुळे त्याची ‘वैज्ञानिक’दृष्ट्या विचार करण्याची बुद्धी प्रगत झाली आणि त्यामुळे तंत्रज्ञानाचेही आकलन करता आले. मात्र सध्या ते आपल्या पाल्यांपर्यंत पोहचू न देता, त्यांच्यावर पुस्तकी ज्ञानाचे संस्कार का करता, यामुळे देशाची प्रगती कशी होणार, असा प्रश आज भाभा आटोमिक अणूसंशोधन केंद्रातील (बीएआरसी) संशोधक आणि वैज्ञानिक अधिकारी डॉ संतोष टकले यांनी शिक्षकांना केला.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून मुंबईत विज्ञान परिषदेने ‘२१ व्या शतकातील विज्ञान शिक्षकांसमोरील आव्हाने’ या कार्यक्रमाचे माटुंगा येथील गुरुनानक खालसा महाविद्यालयात आयोजन केले होते. मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि विज्ञान विषयाच्या सहाय्यक व समन्वयक नम्रता परब यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा अंजली नाईक, खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य किरण माणगावकर, प्राधिकरणाच्या बालशिक्षण विभागाचे प्रमुख निबांजी गिते यांची यावेळी उपस्थित होते.
यावेळी संशोधक संतोष टकले यांनी याप्रसंगी एक तासाच्या अवधीत सूर्य, पृथ्वी, गॅलॅक्सी याविषयी वैज्ञानिक माहिती दिली. ‘धर्म हा शारीरिक चिंतनासाठी आहे. मुलांच्या आचरणात सद्विचार आले तर त्यांच्यात चांगूलपणा येईल. याकरीता अध्यात्म आहे. परंतू दुनियेतील विचारधारांवर चालायचे असल्यास आणि बुद्धी ‘तेज ‘करण्याचे काम विज्ञान आणि विज्ञानाचे शिक्षणच करु शकते. फक्त विज्ञानाचे पाठ न शिकता भूगोल, इतिहास, मराठी, संस्कृत आणि हिंदीही तेवढीच मनापासून शिका. जे वाचाल ते ह्रदयापासून वाचा, असे आवाहन करताना टकले यांनी शिक्षकांमधील ‘पालकांना’ही सल्ला दिला.
मुलांना फक्त शिकवण्याची कृती न करता, त्यात तुम्हीही स्वारस्याने शिकवा, त्यांना प्रेरणा द्या, त्यांना कोचिंग क्लासला पाठवण्याचे ‘कर्तव्य’ पार न पाडता पाल्यांसोबत बसून त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, एकवेळ टीव्ही पाहिला नाही तरी चालेल, स्वयंपाक केला नाही तरी हरकत नाही. पाल्यांच्या या कृतीमुळे मुलांवर शैक्षणिक संस्कार आपोआप होऊन ते अभ्यासात पारंगत होतात. मुलांना जन्म देणे, त्यांच्यावर संस्कार करुन जीवनात ‘लायक’ संस्कार देऊन चांगला नागरिक बनवणे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.
या विद्यान परिषदेत विविध वैज्ञानिक विषयावर विद्यान शिक्षकसोबत चर्चा झाली जेणेकरून भविष्यात विज्ञान शिक्षक म्हणून नेमके काय आत्मसात करून शिकवले गेले पाहिजे याची माहिती या परिषेदेत झाली.
सरकार मुस्लीम आरक्षणासाठी गंभीर असेल तर ऑर्डीयन्स आणता बिल आणावे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनासोबत आहेत ते पास करावे आणि कायदा करावा, तरच आम्हाला वाटेल की हे मुस्लिम आरक्षणा बाबत गंभीर आहे. आधी काय झालं ते आपणा सगळ्यांनी पाहिलं आहेच, इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया
शंभर कोटी हिंदूवर 15 कोटी मुसलमान भारी पडतील अशी भयंकर चिथावणीखोर भाषा वापरणारे एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांना कलबुर्गी पोलिसांनी नोटीस बजावून खुलासा करण्याचे फर्मान सोडले आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी अधिकाऱ्यासमोर पठाण यांनी आपले म्हणणे मांडावे अशी नोटीस बजावण्यात आली आहे. हे कर्नाटकातील कलबुर्गी येथे एमआयएमच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वारिस पठाण यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. पठाण यांना दोन दिवसाच्या आत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कलबुर्गीच्या पोलीस आयुक्तांनी माहिती दिली.
दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा 42 वर, राजधानीत तणावपूर्ण शांतता.
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे व्हावी, याचिकाकर्ते विनोद पाटील यांची सुप्रीम कोर्टात मागणी, सध्या ही सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुरू आहे, रीतसर याचिका दाखल करून त्यांनी ही मागणी केली आहे 17 मार्चला त्यावर सुनावणी, या आरक्षणाच्या संदर्भात घटनात्मक अधिकार सरकारला आहे की, नाही याचा निवाडा या माध्यमातून होईल, हायकोर्टा या बाबी मान्य केल्या होत्या, घटनात्मक खंडपीठाची मागणी मान्य झाल्यास ती या संपूर्ण आरक्षणाच्या केसमध्ये निर्णायक बाब ठरू शकते.
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात होणारा इंदोरीकर महाराज यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांनी ही माहिती दिली आहे. तसंच कोणत्याही संघटनेच्या दबावाला बळी पडलो नसल्याचाही दावा त्यांनी केला. याशिवाय तीन महिन्यानंतर पुन्हा विद्यापीठच्या बाहेर कार्यक्रम घेणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं.
मुस्लीम आरक्षणबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केलं आहे ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर मुस्लीम आरक्षण देण्याबाबत कायदा करु आणि निर्णय घेऊ. शैक्षणिक आरक्षणाबाबत कायदा करुन आरक्षण लागू करण्याबाबत निर्णय घेऊ : नवाब मलिक
जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्यांना आपले प्राण गमावेवे लागले आहेत. अशातच या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. जीवघेण्या कोरोनाचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे आज सकाळी निर्देशांक 1100 अंकांनी घसरला. एवढचं नाहीतर अमेरिकी शेअर मार्केट डाउ जोंसही जवळपास 1200 अंकांनी घसरला.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने दणका दिला आहे. श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे. महापुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी सरकारने छिंदमवर ही कारवाई केली आहे.
मत्स्य दुष्काळाबाबत समिती स्थापन करणार असून चार महिन्यात समितीचा अहवाल आल्यानंतर मत्स्य दुष्काळाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे हवामान खात्याच्या इशाऱ्यावर अनेक दिवस मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात जाऊ शकत नाही. त्यामुळे देखील त्यांचे नुकसान होते, यासाठी ही समिती आहे. याबाबत किती नुकसान झाले, काय करता येईल याचा अभ्यास ही समिती करणार आहे.
HMIS च्या अहलवालानुसार राज्यात 2018-19 या काळात 13,070 नवजात बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत 1402 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. राज्यात 2018-19 या काळात 2 लाख 11 हजार 772 बालकांचे वजन जन्मतः अडीच किलोपेक्षा कमी उघड झालं आहे. गंभीर बाब म्हणजे मुंबईत शहरात सर्वाधिक कमी वजनाची 22 हजार 179 बाळ जन्मली. HMIS च्या अहवालानुसार 1 एप्रिल 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत राज्यात 12 हजार 147 अर्भक मृत्यू आणि 11 हजार 66 बालमृत्यू झाले आहेत. तसंच 1 एप्रिल 2019 ते 15 जानेवारी 2020 दरम्यान 1070 मातांचे मृत्यू झाले. नवजात बालकांच्या मृत्यूची कारणे ही अकाली जन्मलेली बालकं, जन्मतः कमी वजनाचे बालक, जंतू संसर्ग, न्यूमोनिया, सेप्सीस, जन्मत: श्वसावरोध/आघात अशी आहेत. तर
तर प्रसुती पूर्व उच्च रक्तदाब, अति रतक्स्त्राव, जंतूदोष यामुळे मातांचा मृत्यू होतो.
कोल्हापूर : इंदुरीकर महाराज यांचा कार्यक्रम आम्ही उधळून लावू, पुरोगामी विचारांच्या महिला संघटनांचा इशारा. तर कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देऊ, कोल्हापूर युवा सेनेनं दिलं प्रत्युत्तर.
नांदेड : नागपूर-तुळजापूर हायवेवर रास्ता रोको, सोनखेड गावात नागरिकांचा रास्ता रोको, चिमरुडीवर अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी, रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक झालीय ठप्प.
हिंदुत्वाची भूमिका स्विकारल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात हल्लाबोल केला होता. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या पुण्याती कारवाईनंतर मनसेने राज्यातील इतर भागांत आपला मोर्चा वळवला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या 5 हजार रुपयांचे बक्षीस मनसेनं जाहीर केलं आहे. औरंगाबाद येथे मनसेकडून हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी; विधानसभेत छगन भुजबळ यांची मागणी
राजधानी दिल्लीतल्या हिंसाचारावरुन गृहमंत्री कुठे आहात असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखामधून विचारण्यात आला आहे. देशाची अर्थव्यवस्था कोसळत असून भडकाऊ भाषणांचे भांडवल आणि त्यांचा बाजार जोरात सुरू असल्याचे अग्रलेखातू नमूद करण्यात आलं आहे. ज्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिली त्या न्यायमूर्तींची बदली केल्याबद्दल सामनामधून टीका करण्यात आली आहे. न्ययालयासही सत्य बोलण्याची शिक्षा मिळू लागली का? असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रवादाचा उन्माद आणि धर्मांधतेचा मस्तवालपणा या दोन्ही प्रवृत्ती देशाला तीनशे वर्षे मागे ढकलत असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. अशीच घटना काँग्रेसच्या काळात घडली असती तर भाजपनं गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असती. मात्र भाजप सत्तेत असल्यानं असं काहीही होणार नसल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.
नाशिक : आदिवासी विकास विभागाची बनावट वेबसाईट बनविणारा अटकेत. एबीपी माझाने उघडकीस आणले होते बनावट वेबसाईट आणि खोटी जाहिरात प्रकरण. खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून सरकार आणि बेरोजगार तरुणांची केली जात होती फसवणूक. जितेंद्र तायडे असे संशियताचे नाव असून त्याला सायबर सेल पोलिसांनी अटक केलीय. जळगाव जिल्ह्यातून ही अटक करण्यता आली.
मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप गटाची काल बैठक झाली. या बैठकीत महापालिकेत विरोधीपक्ष नेता म्हणून प्रभाकर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महापालिकेमधल्या भाजप पक्षाचा गट नेता म्हणून विनोद मिश्रा यांची निवड झाली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या देशात जे काही होतं, त्याला आपणच जबाबदार आहोत. त्यामुळे देशात काही चुकीचं घडल्यास त्याला इंग्रजांना जबाबदार ठरवता येणार नाही, असं भागवत म्हणाले आहेत.
नागपुरात पाणीपुरवठा करणारे 120 टँकर बंद करण्याचा निर्णय आयुक्त तुकामराम मुंडेंच्या नेतृत्वात पालिकेने घेतला आहे. यामुळे पालिकेचे वर्षाला सुमारे 10 ते 11 कोटी वाचणार आहेत. परंतु अनेक टँकर्स नगरसेवकांच्या जवळच्या लोकांचे असल्याने प्रशासन आणि नगरसेवक यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.
महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेची दुसरी यादी आज जाहीर होणार आहे. या योजनेतील पहिल्या टप्यात साडेतीन हजार कोटींचं वितरण होणार आहे. योजनेच्या पहिल्या यादीत 68 गावांमधील 15 हजार 358 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. दुसऱ्या यादीत किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पहिल्या यादीतून फक्त 15 हजार शेतकऱ्यांना दिलासा, आज किती शेतकऱ्यांना दिलासा मिळतो याकडे सर्वांचं लक्ष
2. फडणवीस सरकारच्या कारभारावर कॅगचे ताशेरे, सिडको घोटाळ्याच्या अहवालावर मंत्रिमंडळात खलबतं, निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशीची सेनेची मागणी
3. कोरेगाव भीमा प्रकरणातील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती, गंभीर स्वरुपाचे गुन्हे अद्याप कायम
4. इंदोरीकरांच्या कोल्हापूर विद्यापीठातल्या आजच्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध, 15 दिवसांत इंदोरीकरांवर गुन्हा नोंदवा अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा
5. राज्यात तापमानाचा विचित्र खेळ, सकाळी-संध्याकाळी 12 अंश सेल्सिअस तापमान तर दुपारच्या वेळेत तापमानाचा पारा पस्तीशीपार
6. दिल्ली हिंसाचारातील मृतांची संख्या 38 वर, हिंसाचारानंतर आज पहिला शुक्रवार, नमाजच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचा शहरात कडेकोट बंदोबस्त
एबीपी माझा वेब टीम