समृद्धी महामार्गाला 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' असं नाव, परिपत्रक निघालं

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Dec 2019 09:40 PM
शांतता-सुव्यवस्थेला गालबोट लागेल, असं वागू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
समृद्धी महामार्गाला 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' असं नाव, परिपत्रक निघालं
उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी कुलदीप सेंगरला जन्नठेपेची शिक्षा, तीस हजारी कोर्टाचा निकाल
अजित पवारांना एसीबीकडून पूर्णपणे क्लीन चिट,
सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीचं कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र
कोल्हापूर : पूरग्रस्तांना योग्य मदत मिळावी, या मागणीसाठी आंदोलन,
पुणे बंगळुरु महामार्गावर संसार थाटला,
पोलिसांकडून महिलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न
डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार,
पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिर आवारात,
रंगभूमीच्या नटसम्राटाला अखेरचा निरोप
शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी दिली. शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरु आहे. आधार क्रमांक लिंक करुन कर्जमाफी देता येईल का याचीही चाचपणी सुरु असल्याचं पवारांनी सांगितलं.

कोल्हापूरच्या चित्रकलेचा जागता इतिहास, ज्येष्ठ चित्रकार, अनेक चित्रकारांचे मार्गदर्शक, रंगबहारचे संस्थापक श्यामकांत जाधव यांचं आकस्मिक निधन झालं. आज सकाळी दहा वाजता उत्तरेश्वर या त्यांच्या निवासस्थानावरुन अंत्ययात्रा निघणार आहे.
सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांमध्ये आयटीनगरी बंगळुरुने यंदा बाजी मारुन हॅट्‌ट्रिक साधली आहे. 2017 आणि 2018 मध्येही सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांच्या यादीतही बंगळुरुच अव्वल होतं. याशिवाय नोकरदारांमध्ये सर्वाधिक वेतन घेणाऱ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे.
महिलांवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात सुनावणी आरोपींना शिक्षा करण्याची प्रक्रिया जलद व्हावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं आजपासून राळेगणसिद्धीत मौनव्रत धारण करणार आहेत. या आंदोलनासंदर्भात हजारे यांनी 10 डिसेंबर रोजी पंतप्रधानांना, तर 13 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर....

1. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात यूपी, गुजरातमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, लखनौत एकाचा तर अहमदाबादेत दोघांचा मृत्यू, आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

2. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादेत नागरिकत्व कायद्याविरोधात भव्य निदर्शनं, कुठेही अनुचित प्रकार नाही, विद्यार्थी आणि सेलिब्रिटींचा लक्षणीय सहभाग

3. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज कोलकात्यात ममता बॅनर्जींची रॅली, जामियातही विद्यार्थ्यांचं आंदोलन, अफवा टाळण्यासाठी दिल्ली, यूपीत मोबाईल-इंटरनेट सेवा बंद

4. बुलेट ट्रेनपेक्षा जनतेला रिक्षाच परवडते, देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर, सावरकरांच्या मुद्यावरुनही भाजपला प्रतिसवाल

5. कर्जमाफी आणि मंत्रिमंडळ विस्तारावर महाविकास आघाडीची खलबतं, नागपुरात ठाकरे, पवार आणि खरगेंची बैठक, 23 तारखेला विस्तार, अजित पवारांचे संकेत

6. आयपीएल लिलावात पॅट कमिन्सवर कोलकात्याची सर्वाधिक साडेपंधरा कोटींची बोली; मुंबईच्या 18 वर्षांच्या यशस्वी जैस्वालवर राजस्थानची 2 कोटी 40 लाखांची बोली

एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.