हिंगणघाट जळीतकांड प्रकरण, आरोपी विकेश नगराळे याची नागपूर कारागृहात रवानगी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
12 Feb 2020 11:57 PM
देगलूर तालुक्यातील खानापूर इथं विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, 150 विद्यार्थी शासकीय रुग्णालय देगलूर इथं दाखल, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती व्यवस्थित, शाळेतील जेवणात पाल निघाल्याचा दावा
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण, आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याची नागपूर कारागृहात रवानगी, सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीला नागपूरला हलवले
विनाअनुदानित गॅस सिलींडरच्या दरात वाढ. आता सिलींडर 145 रुपयांनी महागणार
सिंधुदुर्ग : सावंतवाडीत कचरा डेपोला आग लागली. या आगीत प्लास्टीकने पेट घेतल्याने शेडनं सुद्धा पेट घेतला. प्लास्टिक विघटन करणाऱ्या शेडला मोठी आग लागली. शेडसह प्लास्टिक जळून खाक झालं. आग विझवण्यासाठी सावंतवाडी पालिकेच्या अग्निशमन बंबांच्या सहाय्यानं आग विझवण्यात आली. यातं पालिकेचं 25 लाखांचं नुकसान झालंय. ही आग जाणुनबुजून लावण्यात आली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे अज्ञाता विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आला.
पिंपरी चिंचवडमध्ये एटीएममधून रोकड चोरीचे सत्र सुरूच आहे. एकाच रात्रीत वाकड आणि चाकण परिसरात एटीएममधून रोकड चोरीच्या घटना घडल्यात. चाकणमधील दुसऱ्या बँकेचे एटीएम मशीन पळवण्याचा प्रयत्न फसलाय.
मागील 16 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याबाबत प्रचंड नाराजी दर्शवली आहे. बैठकीच्या एक दिवस आधी बोलवून उद्या तुमचा विषय मार्गाला लावू असं आश्वासन देतात आणि दुसऱ्या दिवशी बैठकीत तुम्ही सुप्रीम कोर्टात जा असा सल्ला देतात. अशा प्रकारे बोलून आंदोलकांची फसवणूक अशोक चव्हाण करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आता आमच्या नियुक्त्या द्या अथवा आमचे मृतदेह आमच्या गावी सुखरूप पाठवा, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलकांनी आता सहकुटुंब आंदोलनाला बसण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
पहिल्याच चेंडूत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी टोलावला षटकार. भांडेवाडी डंपिंग यार्डममध्ये मुंढे यांनी अधिकाऱ्यांचा घेतला क्लास. इतर अधिकाऱ्यांसारखे खालून पाहणी करण्याऐवजी मुंढे यांनी कचऱ्याच्या डोंगरावर चढत एकेक बाब समजून घेतली. कचऱ्याच्या डोंगरावर कचरा वेचणारे का? त्यांच्यासाठी दुसरी निश्चित जागा असताना ते आत कसे काय?
कोल्हापूर परिसरातून जाणाऱ्या पुणे-बंगलोर महामार्गावरील लक्ष्मी टेकडी इथं गॅस टाकी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रकने पेट घेतल्याचे लक्षात येताच ट्रकचालकाने हा ट्रक महामार्गावरच थांबवला. तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती देऊन अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. गॅस टाक्यांनी भरलेला ट्रक असल्यामुळे या मार्गावरील एकेरी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. तीन अग्निशमन दलाच्या गाड्यांनी गॅस टाक्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची आग नियंत्रणात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
अहमदनगर : कर्जत कारागृहातुन फरार आरोपी पकडण्यात पोलीसांना यश. फरार झालेल्या पाचपैकी तिघांना पकडण्यात यश. ज्ञानेश्वर कोल्हे, मोहन भोरे आणि गंगाधर जगताप हे तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात.
मंत्र्यांच्या बंगल्यावर कोटींची उधळपट्टी : एबीपी माझाच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, एकूण 31 बंगल्यावर जवळपास 15 कोटींची उधळपट्टी सुरू आहे. म्हणजेच साधरणत: एका बंगल्यावर 80 लाख ते दीड कोटीपर्यंत खर्च सुरु आहे.
लोकसंख्या नियंत्रणाचं खासगी विधेयक शिवसेना खासदार अनिल देसाईंकडून राज्यसभेत सादर, दोन अपत्य असणाऱ्यांनाच नोकरी आणि शिक्षणात सवलत
पंढरपूर : माघी यात्रेत विठुरायाच्या चरणी तीन कोटीचे भभरुन दान, गेल्या वर्षीपेक्षा एक कोटी 31 लाखाने उत्पन्न वाढलं.
बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर आज पहिला रणजी सामना होत आहे. महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड यांच्यात हा सामना खेळवला जात आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात घाटकोपर-अंधेरी मेट्रो-1 मध्ये विनारांग तिकीट, प्रवास जलदगतीने होण्यासाठी सुरक्षा तपासणी आणि मेट्रोत चढतानाही विद्यार्थ्यांना प्राधान्य
आज बारामतीत महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड यांच्यातील रणजी सामना खेळवला जात आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे मैदानावर आगमन झालय. काही वेळात सामन्याचा प्रारंभ होणार आहे.
कोल्हापूरच्या आकुर्डे येथे पोलीस आणि नागरिकांत धक्काबुक्की, दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी, यात्रेच्या दिवशी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी पोलीस गेले असता घडली घटना
बारामतीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमला बीसीसीआयने राज्यस्तरीय व रणजी सामने खेळविण्यासाठी अधिकृत मान्यता दिलीय. बारामतीत आजपासून पहिला रणजी सामना महाराष्ट्र विरुध्द उत्तराखंड असा खेळविला जाणार आहे, या सामन्याचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते होणार आहे. हा सामना 12 ते 15 फेब्रुवारीमध्ये होणार आहे, याची सर्व तयारी करण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. दिल्लीत आपकडून पुन्हा भाजपला धोबीपछाड, 62 जागांवर आपची मुसंडी, निकालानंतर केजरीवालांची सर्व आमदारांसोबत सकाळी 11 वाजता बैठक
2. भाजपला पर्याय देण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र यावं, पवारांचं आवाहन, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न फसल्याची भाजपवर टीका
3. रोहित पवारांच्या आमदारकीविरोधात भाजप नेते राम शिंदेंची याचिका, मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, रोहित पवारांना उच्च न्यायालयाचं समन्स
4. सोलापुरात 6 महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, 10 जणांविरुद्ध गुन्हा, 5 जण अटकेत
5. मुलगा हवा असल्यास सम तारखेला, मुलगी हवी असल्यास विषम तारखेला स्त्रीसंगत करा, इंदोरीकरांचं किर्तन वादाच्या भोवऱ्यात, गुन्हा दाखल होण्याची शक्यता
6. राणीच्या बागेत पुन्हा नवे पाहुणे, औरंगाबादच्या उद्यानातील २ वाघ जिजामाता उद्यानात, सिद्धार्थ उद्यानातील वाघांची संख्या वाढल्यानं मुंबईत रवानगी