Maharashtra Live Updates:मराठी भाषेचा अभिजात दर्जाचं स्वप्न पूर्ण, दिल्लीतून अखेर शासन आदेश निघाला , वाचा राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स एकाच क्लिकवर

Maharashtra live blog updates in Marathi: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

रोहित धामणस्कर Last Updated: 08 Jan 2025 01:39 PM
AI चा वापर करत उसाची लागवड? बारामतीत प्रयोग यशस्वी

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय तंत्रज्ञानावर) कृषी क्षेत्रात वापर करताना उसाची लागवड बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे केलीय. या संशोधनाची दखल मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नडेला यांनी घेतली. हा यशस्वी प्रयोग एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे  केवीकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर निलेश नलवडे प्रगतशील शेतकरी सीमा चव्हाण त्यांनी दिल्ली येथे याचे सादरीकरण केले. संस्थेच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल देखील मायक्रोसॉफ्टचे पार्टनरशिप  असलेल्या संस्थेने चांगल्या पद्धतीने  शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण करणार असल्याचे देखील सांगितले. भविष्यातील शेती कशी असेल याला डोळ्यासमोर ठेवून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स च्या माध्यमातून शेतीचा प्रयोग बारामती मध्ये केला आहे

भाजपकडून विरोधकांना धक्कातंत्र देण्याचे काम सुरुच

काल ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार 


खासदार अशोक चव्हाण यांच्या मध्यस्थीने काँग्रेस पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार 


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा आक्रमक पवित्रा 


एकामागोमाग एक पक्षप्रवेशाचा सिलसिला

मोठी बातमी! टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग


झटपट श्रीमंतीच्य नादात ३ लाख मुंबई करांना टोरेस कंपनीने गंडा घातला आहे


या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी ३ जणांना अटक केली होती.


या गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेता हा गुन्हा पुढील तपासासाठी आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे


या प्रकरणात शिवाजी पार्क पोलिसांनी १०० हून अधिक तक्रारदारांचे जबाब नोंदवले आहेत


कोट्यावधी रुपयांच्या या गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी


 तानिया कसातोवा, सर्वेश अशोक सुर्वे आणि  वैलेंटिना कुमार या तिघांना अटक केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ‘संघ दक्ष’

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी  भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची गोपनीय बैठक


खात्रीलायक सूत्रांची माहिती


राज ठाकरेंच्या भेटीनंतर शेलारांची संघाच्या नेत्यांसोबत चर्चा


मुंबईत मनसे आणि भाजप युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती


मुंबई महापालिका जिंकण्यासाठी संघही मैदानात

मोठी बातमी! मराठी भाषेचा अभिजात दर्जाचा स्वप्न पूर्ण

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून दिल्लीतून अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आलाय. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मंत्री उदय सामंत यांना हा आदेश सोपवला असून हवा हवा असलेला शासन आदेश निघाल्याने राज्यभर या आदेशाचे स्वागत केलं जातंय .  त्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आलाय. 

भरधाव पिकअपची 15 वर्षीय मुलीला धडक, जागीच ठार, छत्रपती संभाजीनगरात अपघात

छत्रपती सभाजीनगरच्या वैजापूर शहरात भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत एक 15 वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना  सकाळी सहा वाजेच्या सुमारास स्टेशन रोड वरील म्हसोबा चौक परिसरात घडली.ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे . श्रेया हरिश्चंद्र दुसाने वय 15 वर्षे राहणार आनंदनगर असे घटनेतील मयत मुलीचे नाव आहे.या घटनेबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार श्रेया ही सकाळी 6 वाजेच्या सुमारास आनंदनगर येथून शिवप्रतापनगर येथे ट्युशनसाठी जात असताना म्हसोबा चौक परिसरात रास्ता ओलांडत असताना भरधाव पिकअपने तिच्या सायकलला धडक दिली.या अपघातात ती गंभीर जखमी झाली तिला उपस्थित नागरिकांनी तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तिला तपासून मृत घोषित केले.

संतोष देशमुख प्रकरणात संभाजी वायबसे आणि सुरेखा वायबसेंची CID चौकशी

संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुन्हा संभाजी वायबसे व सुरेखा वायबसे या दोघांची सीआयडी कडून चौकशी..


यापूर्वीच संभाजी वायबसे आणि सुरेखा वायभसे यांची सीआयडीने चौकशी केली होती.. मात्र त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले होते..


या हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे त्याच्या तपासा संदर्भात झाली चौकशी..

मोठी बातमी: मराठी भाषेला अभिजात दर्जाचं स्वप्न पुर्ण, उदय सामंतांकडे GR आला

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचं स्वप्न पुर्ण 


उदय सामंतांच्या हाती जीआर प्राप्त 


केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी ना उदय सामंत यांच्या कडे सुपूर्द केली..


थोड्याच वेळात उदय सामंत यांची दिल्ली येथे पत्रकार परिषद

लक्ष्मण हाके यांचा आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप..

प्रभू रामचंद्राच्या जमिनीचा उतारां धस ने आपल्या नावावर करून घेतला..


प्रभू रामचंद्र चे नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्र आणि देशभरात राजकारण करणाऱ्या भाजपच्या सुरेश धस यांनी देवस्थानाची जमीन हडपली. 


शंभू महादेवाच्या देवस्थानाचा फ्रोड केला..


सुरेश धस फडणवीस यांच्या गळ्यातील हाडूक होतील


सत्तेत असलेल्या मंत्र्यावर एसीबी ची धाड पडून त्याच्या PA कडे घबाड सापडलेले देशातील धस एकमेव नेते. 


जरांगेंची जागा धस यांनी घेतली त्यामुळे त्यांच्या दोघात(जरांगे) कोल्डवार..

भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या पोलीस पाटलावर केला कुऱ्हाडीने हल्ला

गोंदियाच्या सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील फुक्कीमेटा येथील घटना...


भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला एका व्यक्तीने डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. तर त्याच्या हातातून कुऱ्हाड हिसकावल्याने त्याने दुसऱ्याच्या पोटावर देखील चावा घेतला. गोंदियाच्या सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम फुक्कीमेटा येथे ही घटना घडली. तेजराम येरपुडे (५६) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पत्नी इंदून येरपुडे हिच्यासोबत भांडण करीत असल्याने इंदूने फिर्यादी पोलिस पाटील यांना बोलवले. पोलीस पाटील समजूत काढण्यासाठी घरी गेले. मात्र, तेथे गेल्यावर आरोपी तेजराम याने तू नेहमी माझ्या घरगुती भांडणात मधात पडतो. यामुळे पहिले तुलाच कापून ठार करतो, असे म्हणत फिर्यादी चंद्रकुमार यांच्या डोक्यावर उजव्या बाजूला कुन्हाडीने वार केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन रक्त निघू लागले. एवढ्यात आरोपी तेजराम दुसरा वार करण्याच्या बेतात असताना डॉ. राजकुमार हत्तीमारे यांनी त्याच्या हातातून कुऱ्हाड हिसकावून घेतली. यावर आरोपी डॉ. हत्तीमारे यांच्या पोटावर उजव्या बाजूला चावा घेऊन पळ काढला. पोलिसांनी भान्यासं २०२३ कलम १०९ (१), ११८ (१), १२१(२) १३२ अंतर्गत गुन्हा नोंद केला

धक्कादायक! बीड शहरातील पोलीस मुख्यालयावर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट..


बीड शहरातील पोलीस मुख्यालयावर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने, मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. आज सकाळी ही घटना उघडकीस आलीय.अनंत मारोती इंगळे रा. कळंमआंबा ता.केज जि बीड असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे..दरम्यान पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या का केली ? हे अद्याप अस्पष्ट असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे..

भंडाऱ्यात नागरिकांचं धोकादायक स्थितीत वाघासोबत फोटोसेशन

एका झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाची माहिती होताचं भंडाऱ्यातील नागरिकांनी वाघालाचं अक्षरश: घेरलं आणि त्याच्यासोबत अगदी दोन ते पाच फूट अंतरावरून धोकादायक असं फोटोसेशन केलं. यासोबतच वाघासमोर हुल्लडबाजी करून त्याला गोटे मारण्याचा संतापजनक प्रकार भंडाऱ्याच्या हरदोली तई या गावालगत आज सकाळी घडलां आहे. सध्या वाघाच्या सुरक्षेसाठी वनविभागाचं पथक तिथं पोहोचलं असून नागरिकांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न वनाधिकारी करीत आहेत. मागील २० दिवसांपूर्वी असाच एक प्रकार अड्याळ वनपरिक्षेत्रात घडला होता. त्यानंतर आज हा प्रकार पुन्हा समोर आल्यानं वन विभागानं अशा नागरिकांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया वन्य प्रेमींनी व्यक्त केली आहे.

मी कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही- सुरेश धस

मी कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही


त्यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी मागे असलेल्या बंगल्यातील लोकांना


बीडमध्ये नैतीकता नाही; मात्र मी राजीनामा मागितलेला नाही


वाल्मिक कराडनं डिफेंडर गाडी घेतली... वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी पैसे बुडवणा-यांना पाठीशी घातलं हे उघड आहे


पंकुताईंनी ७४५ शिक्षकांची भरती सर्व नियम धाब्यावर बसवून नेमणूक केलीय

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट ॲक्शन मोडवर

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा पक्ष ॲक्शन मोडवर


युवक, महिला आणि अल्पसंख्यांक विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी शरद पवार साधणार संवाद 


आज आणि उद्या दिवसभर शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांसोबत मॅरेथॉन बैठका

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आशिष शेलार पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या भेटीला

मंत्री आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले आहेत


मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत


कालच्या मनसेच्या बैठकीत देखील आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत जाण्याचा सूर दिसून आला


यावर देखील काही चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे

मुंबईतील केबल कार प्रकल्पासाठी केंद्र सरकार सकारात्मक 

पर्यटन आणि जलद वाहतूक होण्याच्या दृष्टीने केबल कार प्रकल्पाला तत्वतः मंजुरी 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कोस्टल रोड, अटल सेतू, सी एस एम टी परिसर, ठाणे नवी मुंबईतील खाडी किनारे, तुंगारेश्वर अभयारण्य तसेच गर्दीच्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यासाठी अभ्यास केला जाणार, 
सर्वेक्षण करून अंतिम अहवाल केंद्राला सादर केला जाणार, अहवाल बघून त्यानंतर अंतिम मंजुरी दिली जाणार, 
दिल्लीत झालेल्या परिवहन मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडला होता प्रस्ताव

मुंबईतील केबल कार प्रकल्पासाठी केंद्र सरकार सकारात्मक 

पर्यटन आणि जलद वाहतूक होण्याच्या दृष्टीने केबल कार प्रकल्पाला तत्वतः मंजुरी 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कोस्टल रोड, अटल सेतू, सी एस एम टी परिसर, ठाणे नवी मुंबईतील खाडी किनारे, तुंगारेश्वर अभयारण्य तसेच गर्दीच्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यासाठी अभ्यास केला जाणार, 
सर्वेक्षण करून अंतिम अहवाल केंद्राला सादर केला जाणार, अहवाल बघून त्यानंतर अंतिम मंजुरी दिली जाणार, 
दिल्लीत झालेल्या परिवहन मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडला होता प्रस्ताव

HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर

केंद्रीय आरोग्य सचिवांनी घेतली सर्व राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक


बैठकीत HPMV व्हायरसच्या वाढत्या केसेस वर झाली चर्चा


राज्य सरकारची याबाबत कशी तयारी आहे याचाही बैठकीत घेण्यात आला आढावा


नागरिकांनी घाबरून न जाण्याच आवाहन राज्यांच्या आरोग्य विभागाने करावं सोबतच या अजाराबाबतची जनजागृती करण्याचे देखील राज्यांना निर्देश

तुळजाभवानी देवीची सुरक्षितता धोक्यात, गाभाऱ्यातील शिळांना तडे

तुळजाभवानी देवीच्याच्या मुख्य गाभाऱ्यातील शिळांना तडे 


तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील चार शिळांना तडे 


गाभाऱ्याच्या संवर्धनावेळी धक्कादायक बाब समोर


तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत यांच्यामुळे धक्कादायक बाब समोर

छत्रपती संभाजीनगरात लक्ष्माण हाकेंच्या नेतृत्वात ओबीसी समाजाची निदर्शने आंदोलन

छत्रपती संभाजीनगरात ओबीसी समाजाची निदर्शने आणि आंदोलन..


क्रांती चौकात प्रा लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात निदर्शने आणि सभा.


सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ते नवनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या आरोपींना कडक शासन करावं..


ओबीसी नेते आणि  मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्याचा निषेध.


आज छत्रपती संभाजी नगर मध्ये ओबीसी समाजाच्या वतीने मोठ आंदोलन करण्यात येणारय, आज दुपारी बारा वाजता मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ते नवनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या आरोपींना कडक शासन करावं तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण आणून ओबीसी नेत्यांना टारगेट केल्या जात असल्याचा निषेध म्हणून या ठिकाणी मोठ आंदोलन होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राज्यातील 100 दिवसांच्या नियोजन आराखड्याची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आज १०० दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक


याआधी गृह, नगर विकास, कौशल्य विकास आणि महिला व बालकल्याण विभागाचा आढावा घेतल्यानंतर आज महसूल व मुद्रांक शुल्क, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, सामान्य प्रशासन सेवा, राज्य उत्पादन शुल्क विभागासंदर्भात बैठक


पुढील १०० दिवसांचे नियोजन कशाप्रकारे ह्या विभागात असणार यासंदर्भातला रोडमॅप तयार करण्याच्या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना सूचना


मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारल्यानंतर १०० दिवसांच्या कामाची आखणी करण्यास अधिकाऱ्यांकडून सुरुवात

HMPVसाठी आयसोलेट वॉर्ड राखीव ठेवण्याच्या सूचना

नागपूर मध्ये HMPV चे दोन संशयित रुग्ण आढळल्यानंतर नागपूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.


नागपूर महानगर पालिकेच्या इंदिरागांधी रुग्णालयात 10 बेड चे HMVP आयसोलेटेड वॉर्ड उभारण्यात आले 


याव्यतिरिक्त नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरागांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे देखील HMPV साठी आयसोलेट वॉर्ड राखीव ठेवायच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहे.


नागपूर महानगर पालिकेच्या इंदिरागांधी रुग्णालयातील HMPV आयसोलेटेड वॉर्ड मधून उपाययोजनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी 

सुरेश धस अजित पवारांना देवगिरी निवासस्थानी भेटायला पोहोचले आहेत

संतोष देशमुख प्रकरणात धक्कादायक खुलासे करणारे सुरेश धस अजित पवारांना भेटण्यासाठी  देवगिरी निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत.


अजित पवरांशी धस काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष


संतोष देशमुख प्रकरणावरून काय कारवाई होणार?

धक्कादायक! मोक्कातील आरोपी सुटल्यावर दुधाचा अभिषेक, मिरवणूकीनं स्वागत

मोक्कातील आरोपीवर सुटल्यावर दुधाचा अभिषेक 


कळंबा कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणुकीने केले स्वागत 


कोल्हापूर पोलिसांनी सात जणांवर केला गुन्हा दाखल 


आरोपी अनिकेत सूर्यवंशी याच्या टोळीचा कारनामा


पोलिसांच्या कारवाईची कुनकुन लागतात रिल्स केले डिलीट

बांग्लादेशी नागरिकाला रत्नागिरीचा जन्मदाखला दिला, अन्...

बांगलादेशी नागरिकाला रत्नागिरीतील जन्म दाखला दिल्याप्रकरणी रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांची मुंबई पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती आहे. शिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील याबाबतचे अहवाल सादर करा असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईतील एका गुन्ह्यामध्ये तपास करत असताना आरोपी असलेल्या बांगलादेशी नागरिकाला रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव ग्रामपंचायतने जन्म दाखला दिल्याची बाब समोर आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी याबाबतची कारवाई करत जन्म दाखला देण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या तत्कालीन सरपंच अल्ताफ संगमेश्वरी आणि  अधिकारी यांची चौकशी केली. मोहम्मद इद्रिक इसाक शेख असा जन्मदाखला दिलेल्या बांगलादेशी व्यक्तीचे नाव आहे. तत्कालीन ग्रामसेवक यांची पदोन्नती झाली असून ते सध्या जिल्ह्यात अन्य ठिकाणी विस्तार अधिकारी म्हणून काम करतात.

तिसरे आपत्य जन्माला घालणं भोवले, पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना नोकरीला मुकावं लागलं

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तांना नोकरीला मुकावे लागलंय.


तिसरं आपत्य जन्माला घालणं त्यांना अशा रीतीने भोवलेलं आहे.


महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ही कठोर कारवाई केली आहे.


श्रीनिवास दांगट असं त्यांचं नाव असून ते सध्या समाज विकास विभागाच्या दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त पदावर रुजू होते.

गँगस्टर अरुण गवळींना 28 दिवसाची संचित रजा मंजूर

गँगस्टर अरुण गवळी यांना 28 दिवसाची संचित रजा मंजूर ..


मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केली संचित रजा ..


याआधी अरुण गवळी यांनी कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडे संचित रजेसाठी अर्ज केला होता तो नामंजूर केल्याने अरुण गवळी यांनी नायायालयात धाव घेतली होती.

धुळ्यात नागरिक कुडकुडले, पारा 4.4 अंशावर!

राज्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. धुळे शहारासह जिल्ह्याचे तापमान 4.4 अंशावर आले असून कडक्याच्या  थंडीत वाढ झाली आहे...


गेल्या 15 दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. मात्र उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे...


या थंडीचा परिणाम जनजीवनावर होत आहे...

इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती

केंद्र सरकारने मंगळवारी अवकाश शास्त्रज्ञ व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यांना अंतराळ विभागाचे सचिवही करण्यात आले आहे. 14 जानेवारी रोजी त्यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांची जागा घेतील. नारायणन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. सध्या ते वालियामाला येथील लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे (LPSC) संचालक आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ नारायणन यांना 40 वर्षांचा अनुभव आहे. रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशनमध्ये ते तज्ज्ञ आहेत.

Nagpur Couple Suicide: बाळ होत नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या

लग्नाला अनेक वर्षे होऊनही मूल होत नसल्याने नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मार्टिन नगरमध्ये एका दाम्पत्याने आत्महत्या (Nagpur Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे जरीपटका परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Kumbh Mela 2025: कुंभमेळासाठी एटीएससोबत आयटीयूएस मरीनशी महत्त्वाचा करार

उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये १३ जानेवारी २०२५ रोजीपासून सुरू होणारा महाकुंभ मेळासाठी ४० कोटी भाविक संगमावर पवित्र स्थानासाठी येणार आहेत हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक समारंभांपैकी एक असणार आहे,तर दूसरीकडे हा सोहळा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (ATS) कुंभमेळावा २०२५ साठी बचाव पथके आणि उभयचर बोटी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा करार केला आहे. ज्यामध्ये आय टी यू एस मरीन चा देखील समावेश आहे. ही बोट पाण्यावर आणि जमिनीवर सुध्दा चालते.


या कराराअंतर्गत, आय टी यू एस मरीन उत्तर प्रदेश एटीएसला उभयचर बोटी आणि प्रशिक्षित बचाव पथके उपलब्ध करून देईल, ज्यामुळे गंगा नदीच्या काठावर आयोजित कार्यक्रमामध्ये गर्दीच्या व्यवस्थापन,हवामानातील अनिश्चितता आणि इतर आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करणार आहे.

Mumbai News: अग्निशमन दलाच्या भरती प्रक्रियेत प्रतिक्षा यादीतील मुलांना संधी देण्याची मागणी

मुंबई २०२३ मध्ये ९१० पदांसाठी अग्निशमन दलाची भरती प्रक्रिया झाली होती. या भरतीत प्रतिक्षा यादीतील मुले मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसली आहेत. भरती प्रक्रियेत नियुक्ती होऊनही पदभार न स्विकारलेल्या १५१ रिक्त पदांवर प्रतिक्षा यादीतील मुलांना संधी द्यावी ही या उपोषण कर्त्या मुलांची मागणी आहे. २९ डिसेंबर २०२४ पासून हे विद्यार्थी आझाद मैदानावर उपोषण करत न्याय मागत आहेत. या मुलांनी पालिकेशी संबधित अधिकार्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली असता तीही अधिकारी देत नाहीत. पालिकेने या  आधी झालेल्या भरतींमध्ये रिक्त जागेच्या ठिकाणी प्रतिक्षा यादीतील मुलांना संधी दिलेली आहे. 

Torres Scam : कुणी कर्ज काढून पैसे गुंतवले, लाखो मुंबईकरांची टोरेसकडून फसवणूक

मुंबई : झटपट श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांना टोरेस कंपनीने गंडा घातला आहे. कुणी कर्ज काढून पैशांची गुंतवणूक केली तर कुणी सोन्याचे दागिने गहाण ठेवले आणि टोरेसच्या बोगस योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक केली. आता टोरेस कंपनी मुंबई, नवी मुंबई अन् मीरा रोड परिसरातील कार्यालयांना टाळं लावून पसार झाली आहे. दादरच्या कार्यालयातून रक्कम, दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Mumbai News: मुंबईतील कामा रुग्णालयात NICU बालकांसाठी खास व्यवस्था

मुंबईतील ‘कामा‘ रुग्णालयात  लवकरच  संसर्गरहित  एनआयसियू  बालकांसाठी 21 खाटांची  व्यवस्था. काही महिन्यांपूर्वी  कामा रुग्णालयात  २१ खाटांच्या एनआयसीयूचे  उदघाट्न करण्यात आलेले. एनआयसीयू आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. कामा मध्ये दरवर्षी ४५० नवजात बालकांवर उपचार होतात. कामा रुग्णालयात दरवर्षी ४५०हून अधिक नवजात बालकांना एनआयसीयूची आवश्यकता असते. बेड्स वाढल्यामुळे अधिक बालकांना दाखल करून घेता येईल. एक किलोपेक्षा कमी वजनाच्या ९९ टक्के बाळांना एनआयसीयू केअरमध्ये वाचवता येते असल्याचे कामा हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Gangster Arun Gawli: गँगस्टर अरुण गवळीला पॅरोल मंजूर

गँगस्टर अरुण गवळी यांना 28 दिवसाची संचित रजा मंजूर . मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केली संचित रजा. याआधी अरुण गवळी यांनी कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडे संचित रजेसाठी अर्ज केला होता तो नामंजूर केल्याने अरुण गवळी यांनी नायायालयात धाव घेतली होती.

Mumbai News: कोस्टल रोडवर जाहिरातीचे फलक लावण्यास परवानगी

मुंबई: सागरी किनारा मार्गाजवळच्या परिसरात जाहिरात फलक लावण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाला पर्यावरण विभागाची मंजूरी मिळाली. महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) या जाहिरात फलकांसाठी मंजुरी दिली आहे. गेल्यावर्षी सागरी किनारा मार्ग परिसरात जाहिरात फलक लावण्यास शिवसेनेने (ठाकरे गट) विरोध केला होता. महापालिकेच्या महसूलात वाढ व्हावी यासाठी पालिकेच्या अनुज्ञापन विभागाने मार्च २०२४ मध्ये भुलाबाई देसाई मार्ग परिसरात जाहिरात फलक लावण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्या फलकांसाठी एमसीझेडएमएच्या परवानगीसाठी पालिका प्रशासनाने प्रस्ताव सादर केला होता. आता एमसीझेडएमएने या जाहिरात फलकांसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे

पार्श्वभूमी

Maharashtra live blog updates in Marathi: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.