VIDEO | अमोल कोल्हे यांचं भाषण | पिंपरी चिंचवड | हॅलो माईक टेस्टिंग | एबीपी माझा
...म्हणून मी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत आलो : अमोल कोल्हे
एबीपी माझा वेब टीम | 27 Apr 2019 11:49 PM (IST)
शिवसेनेला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले मराठी अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या प्रचाराची आज सांगता केली. यावेळी कोल्हे यांनी शिवसेना सोडण्यामागचा गौप्यस्फोट केला.
डॉ. अमोल कोल्हे – डॉक्टर, अभिनेता आणि आता राजकीय नेते, असा प्रवास असणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत बऱ्यापैकी महत्त्वाचं स्थान निर्माण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील मालिकेत शिवरायांची भूमिका साकारल्याने महाराष्ट्रासह देशभरात पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये विशेष आकर्षण आहे. शिवाय, डॉ. कोल्हे यांची मुद्देसूद आणि स्पष्ट वक्तृत्व शैलीही शिवसेनेच्या प्रचारासाठी महत्त्वाची ठरू शकते.
पुणे : शिवसेनेला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले मराठी अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या प्रचाराची आज सांगता केली. यावेळी कोल्हे म्हणाले की, शिवसेनेने मला साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढाल का? असे विचारले होते. त्यावेळी मी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी करणार नाही. असे बजावून शिवसेनेला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. अमोल कोल्हे हे शिवसेनेचे नेते होते. काही अमोल कोल्हे यांना शिवसेनेने उदयनराजेंविरोधात निवडणूक लढण्यास सांगितले होते. परंतु कोल्हे यांनी त्यास विरोध करत शिवसेनेला रामराम केला. आज अमोल कोल्हे यांनी शिवसेना सोडण्यामागचा गौप्यस्फोट केला.