मुंबई : वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव दिला असून त्याच प्रस्ताववर प्रकाश आंबेडकर चर्चा करतील, नव्याने प्रस्ताव त्यांना दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडली. आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संजय राऊत यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. 


मोदी आणि निवडणूक आयोग एकाच नाण्याच्या दोन बाजू


ते म्हणाले की आम्ही परिवर्तनाचा चंग मांडला असून आम्ही आमचा निर्धार पूर्ण करू. ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे असा संशय निर्माण लोक करत आहेत याचे निरसन आयोगाने करावे. मोदी आणि निवडणूक आयोग एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या असून निवडणुका पारदर्शकपणे होतील याची मोदी गॅरेंटी घेणार का? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. 


दरम्यान महाविकास आघाडीच्या जागावाटपावर बोलताना संजय राऊत यांनी ऑल इज वेल असल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की मित्रपक्षांसोबत बोलणी सुरू असून वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे.


कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात सांगलीची जागा


उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा राजू शेट्टी यांनी भेट मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मशालवर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र तो प्रस्ताव नाकारला असून बाहेरून पाठिंबाची मागणी केली. त्या संदर्भात बोलताना संजय राऊत यांनी त्यावर चर्चा होईल, असे सांगितले. हातकणंगले आणि इतर लोकसभा मतदारसंघावर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. 


राऊत यांनी कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात सांगलीची जागा घेतल्याचे सांगितले. त्यामुळे जागावाटप जाहीर झाल्यानंतर तुम्हाला कुणाला कोणती जागा मिळाली याची माहिती मिळेल असं त्यांनी यावेळी सांगितले. 


दरम्यान राहुल गांधी यांच्या भारत जोडू नये यात्रेवरून संजय राऊत यांनी टोला लागायला. ते म्हणाले की ते यात्रा यशस्वी करत असतील, तर विरोधकांच्या पोटामध्ये गोळा का यावा? अशी विचारणा त्यांनी केली. उद्या इंडिया आघाडीची सभा शिवाजी पार्कवर होणार असून सभेसाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहतील असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.


इतर महत्वाच्या बातम्या