Kalyan: धावत्या लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा फायदा घेत महिला डब्यात महिलांची पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत महिला चोराला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेनं आत्तार्पयत किती महिलांची पर्स लांबविली आहे? याचा तपास पोलिस करीत आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलीस प्रशासनानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं सल्ला दिलाय. 


रायगडमध्ये राहणाऱ्या दुर्गा ब्राह्मणो ही 35 वर्षीय महिला गुरुवारी दुपारी सीएसटी लोकल ट्रेनमधून प्रवास करीत होती. कल्याण स्थानकात गाडी आल्यावर त्यांच्याजवळील रोकड आणि महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स चोरी झाल्याची त्यांच्या लक्षात आलं . दुर्गा यांनी त्वरीत फलाटावर असलेल्या महिला पोलिसाला सांगितलं. महिला पोलिसांनी लोकल डब्यात चढून तपासणी सुरु केली. याच दरम्यान एक संशयीत महिला त्याच डब्यात दिसून आली. महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे दुर्गा हिची गायब झालेली पर्स मिळून आली.


तान्हाबाई पवार असे या 42 वर्षी महिलेचे नाव असून ती मुंबईत राहते. तान्हाबाई ही सराईत गुन्हेगार आहे. लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा फायदा घेत तिने अनेक चोरीच्या घटना केल्या असून पोलिसांचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती कल्याण जीआरपीच्या महिला पोलिस अधिकारी अर्चना दुसाने यांनी दिली आहे.


कल्याण: महागड्या साड्या, दागिन्यांची हौस भागवण्यासाठी महिला बनली चोर
महागड्या साड्या आणि मौल्यवान दागिन्यांची हौस भागवण्यासाठी चोरी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आरती पाटील असे अटक केलेल्या या महिलेचे नाव आहे. हौस पूर्ण करण्यासाठी आरती पाटील ही महिला बाजारात गर्दीच्या ठिकाणी ब्लेडचा वापर करून खरेदीत व्यस्त असणाऱ्या महिलांची पर्स चोरी करत असे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरती पाटील आणि तिची साथीदार शालिनी पवार हिला अटक केली. या दोघींकडून नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून 15 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना कल्याण येथे घडली आहे. 


हे देखील वाचा-