सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विवेक रेडकर यांच्या हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या इथिकल कमिटीला वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी भारत सरकारच्या ड्रग कंट्रोलर जनरल यांनी परवानगी दिली आहे. सेंटरचे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी ही माहिती दिली. संशोधनाच्या प्रमाणिकरणासाठी एथिकल कमिटीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोधन करताना त्याचे निकष ठरवणे महत्त्वाचे असते. कोकणातील मान्यता मिळालेले हे पहिलेच वैद्यकीय संशोधन केंद्र आहे.


केंद्र सरकारच्या ड्रग कंट्रोलर जनरल यांनी अधिकृत केलेल्या रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या वैद्यकीय क्षेत्रात नव्याने येणारे संशोधन फारच महत्त्वाची ठरेल. या संशोधनात ट्रायल्समध्ये एथिकल कमिटीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोध करताना त्याचे निकष ठरवणे महत्त्वाचे असते. संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची पडताळणी होते. प्रत्येक संशोधनाचे सर्व रेकॉर्ड नियमाप्रमाणे जतन करणे आणि त्यांचे प्रमाणिकरण करणं आवश्यक असते. या सर्व गोष्टींचे नियमन करण्याचं काम इथल्या एथिकल कमिटीकडून केलं जातं. एथिकल कमिटीच्या मान्यतेशिवाय अशा कोणत्याही संशोधनास अधिकृत करता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या एथिकल कमिटीला मान्यता दिली आहे. 


डॉ. सागर रेडकर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने अनेक संशोधन प्रबंध देश विदेशात अमेरिकन डायबेटिक असोसिएशन युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी, ट्रॉपिकल मेडिसीन, ऑस्ट्रेलियन मेडिकल असोसिएशन अशा नावाजलेल्या संघटनांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्त्व केले आहे. या सर्व ठिकाणी त्यांनी आपले स्वत:चे मूळ संशोधन प्रबंध सादर केले. डॉ. विवेक रेडकर यांनी मेडिकल वॉरियर्सची दुसरी फळी उपलब्ध करुन देणअयासाठी मार्गदर्शन करणारा प्रबंध आयुषचे मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे सादर केला होता. केंद्र सरकारने त्याची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याला मान्यता दिली.


याचा फायदा कोकणातील वैद्यकीय संशोधन करणाऱ्या अॅलोपथी, आयुर्वेद आणि होमिओपथीच्या डॉक्टरांना भविष्यात होणार आहे. विविध औषध कंपन्यांना त्यांच्या नवीन औषधांच्या डबल ब्लाईंड ट्रायल्स तसंच औषधांच्या होणाऱ्या दूरगामी परिणामांच्या चाचण्या व त्या अनुषंगाने होणारे संशोधन आता कोकणात होऊ शकेल.