मुंबई : राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार अशी स्थिती निर्माण झाली आहे. परीक्षांसंदर्भातील अंतिम निर्णय राजपाल घेणार आहेत. कायद्यानुसार निर्णय होणार अशी राज्यपालांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील निर्णय अधांतरी अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल असे कळविले आहे.


अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल असं राज्यपालांनी म्हटलं आहे. राज्य सरकारना निर्णय राज्यपालांना मान्य नसल्याचं दिसून येतंय. परीक्षा रद्द झाल्याची माहिती प्रसारमाध्यमातून कळाली आणि राज्य सरकारचा निर्णय ऐकून धक्का बसल्याचं राज्यापालांनी म्हटलं.


भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर एटीकेटी असणाऱ्या विद्यार्थांचं काय असा प्रश्न उपस्थित केला होता. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं आणि राज्यपालांचीही आज भेटही घेतली होती. जवळपास 40 टक्के विद्यार्थ्यांना एटीकेटी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा वर्ष वाया जाऊ शकतं, अशी चिंता व्यक्त केली होती.

Ashish Shelar | एटीकेटी लागलेले विद्यार्थी नापास ठरु नयेत : भाजप नेते आशिष शेलार