एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जून 2020 | मंगळवार

1. मुंबई, कोकणावर 'निसर्ग' चक्रीवादळाचं संकट, येत्या बारा तासात तीव्र वादळात रुपांतर होण्याची शक्यता, मुंबई-ठाण्यासह पालघर, रायगड, सिंधुदुर्गात एनडीआरएफ टीम सज्ज 

2.चक्रीवादळ हरिहरेश्वर ऐवजी अलिबागला धडकण्याची शक्यता; रायगड जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

3.बीकेसीतल्या कोविड सेंटरला चक्रीवादळाचा धोका, रुग्ण इतरत्र हलवण्यास सुरुवात, संभाव्य धोका पाहता आरोग्य यंत्रणेची खबरदारी 

4. मेड इन इंडिया, मेड फॉर वर्ल्डचा नारा देताना पंतप्रधान मोदींकडून पुन्हा आत्मनिर्भर भारताचा सूर, उद्योजकांसोबत सरकार ठामपणे उभं असल्याचाही ग्वाही 

5. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 2 लाखांच्या उंबरठ्यावर; गेल्या 24 तासांत 204 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातल्या कोरोनाबाधितांची संख्या 70 हजारांवर 

6. कोरोना संकटात दारोदारी जाऊन माहिती गोळा करण्याचं काम, आशा वर्कर्सना दिवसभराच्या कामाचा मोबदला केवळ 30 रुपये

7.मुंबईतील हिंदुजा, जसलोक, लीलावती, बॉम्बे हॉस्पिटलला महाराष्ट्र सरकारकडून कारणे दाखवा नोटीस, ठरवलेल्या दरात बेड उपलब्ध न केल्यानं कारवाई 

8. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात लवकर निर्णय घ्या, भाजपच्या आशिष शेलारांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, शेलारांनी घेतली राज्यपालांची भेट 

9. इंडिया ऐवजी भारत करा; देशाचं नाव बदलण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका 

10. सकारात्मक बातमी! लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग करत केली पाणीटंचाईवर मात, नांदेडमध्ये बाप लेकाने 4 दिवसात खोदली विहीर

विशेष : अँड्रॉईड फोनमधील चिनी अॅप शोधणारं नवं अॅप, रीमूव्ह चायना अॅप कसं काम करतं?

BLOG | 'एकाच जागी बसा...हलू नका' : कोविड-19 स्थलांतरीत आणि आत्म्याची जोपासना, स्तंभलेखक विनय लाल यांचा ब्लॉग 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK/enxBR