Corona in Maharashtra : मागील काही दिवसांत कोरोनाच्या (Corona) संकटाने पुन्हा एकदा हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. काहीशी आटोक्यात असणारी कोरोना रुग्णांची संख्या आता लक्षणीय होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. यावेळी 15 ते 18 वयोगटाचं लसीकरण, निर्बंध आणि ओमायक्रॉनवरील (Omicron) उपचारपद्धती अशा साऱ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली.


टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (30 डिसंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी आणि टास्क फोर्सचे पदाधिकारी यांची दोन तास बैठक झाली. ज्यावेळी कोरोनासंबधी विविध गोष्टींवर चर्चा झाली. कोरोनारुग्णांची वाढती संख्या, ओमाक्रॉनचं संकट, लसीकरण इत्यादींवर चर्चा झाली असून निर्बंध आणि पुढील उपाययोजने संबधित माहिती मुख्यमंत्री येत्या एक-दोन दिवसांतच निर्णय घेऊन सांगतिल असं टोपे म्हणाले. टोपे यांनी नागरिकांना गर्दी अजिबात करु नका असं सांगताना 31 डिसेंबर रोजीही काळजी घ्या असं आवाहन केलं.  


'शाळा तूर्तास बंद होणार नाहीत'


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच 15 ते 18 वर्षांतील मुलांच्या लसीकरण होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर या वयोगटातील मुले शाळा आणि महाविद्यालयात जात असून त्यामुळे शाळा, महविद्यालय बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत बोलताना टोपे यांनी सध्यातरी शाळा बंद होणार नसून लसीकरण शाळेत न घेता मुलांना गटा-गटाने लसीकरणासाठी नेलं जाईल, यावेळी सर्व महत्त्वाची काळजी घेतली जाईल. असंही टोपे म्हणाले 


हे ही वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha