मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला धान्य पुरवठा करण्यासाठी रास्त भाव दुकानदारांना धान्य देण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्या आणि त्यांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. आहे. त्यानुसार राज्याचे वैधमापन शास्त्र व दक्षता विभागाने वाशी येथील एपीएमसी मार्केट येथे कारवाई केली. विभागाने केलेल्या कारवाईत 2 कोटी रूपयांचा कडधान्यांचा साठा जप्त केला असून राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. राज्यात कुठे असे प्रकार होत असतील तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तसेच राज्यात कुठे असे प्रकार होत असतील तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या तपासणीत ताज ऍग्रो कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड टी टी सी इंडिया एरिया पावणे नवी मुंबई व वसवाल राधेशाम भंडारी टी टी सी इंडिया एरिया पावने नवी मुंबई यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दोन कोटी रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कोकण विभागाचे उपनियंत्रक वैधमापन शास्त्र डॉ.खारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्याचे वैधमापन शास्त्र सहायक नियंत्रक सी.सा.कदम, निरीक्षक सु.रो कुटे, रा. गु सपकाळ यांनी केली आहे.
राज्यात जीवनावश्यक वस्तूंसह सॅनीटायझर, मास्कची साठेबाजी करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सर्वत्र या प्रकारच्या कारवाई सुरू आहे. साठेबाजी करणारे आणि चढ्या किंमतीने विकणाऱ्या व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येत असून यामध्ये त्यांना सात वर्षाची शिक्षा सुद्धा होऊ शकते.
संबंधित बातम्या :
महावितरणच्या ग्राहकांना दिलासा; मार्च-एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश
रेड झोन वगळता अन्य जिल्ह्यात उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबाबत प्रस्ताव करण्याच्या सूचना, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती
Newspaper Distribution | राज्यभरात 15 एप्रिलपासून वृत्तपत्रवितरणास सुरुवात होणार, वृत्तपत्र सुरक्षित असल्याचं WHOकडून जाहीर