Alliance Air flight services : कोल्हापूर ते हैदराबाद (Kolhapur and Hyderabad) दरम्यान अलायन्स एअरची (Alliance Air flight services) विमानसेवा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. रविवारी कोल्हापूर विमानतळावरून विमान कंपनीचे शेवटचे उड्डाण झाले. गेल्या दोन वर्षांपासून सेवा अविरत सुरु होती. अलायन्स एअरची विमानसेवा बंद झाल्यामुळे इंडिगो आणि स्टार एअरलाइन्स या दोनच कंपन्यांची हैदराबाद, मुंबई व तिरुपती या मार्गावरील विमानसेवा सुरू आहे.


याबाबत माहिती देताना विमानतळ संचालक अनिल शिंदे (Airport director Anil Shinde) म्हणाले, आम्ही अलायन्स कंपनीला सेवा सुरू ठेवण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक अडचणींबाबत आम्हाला सांगण्यात आले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अलायन्स एअरलाईन इतर अधिक फायदेशीर मार्गांवर सेवा सुरू करण्यास उत्सुक आहे. परंतु, आमच्याकडे (Kolhapur Airport) हवामानाच्या सर्व परवानग्या असल्याने, फ्लाइट ऑपरेटर्स येथे यशस्वीपणे सेवा सुरू करण्याची क्षमता आहे.


गेल्या सहा महिन्यांत विमान कंपनीने अनेक वेळा उड्डाणे रद्द केली होती. त्यामुळे अनेकवेळा विलंब झाला होता. नवरात्र काळात उड्डाणे रद्द केल्याने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील प्रवासी कोल्हापूर विमानतळावर दोन दिवस अडकून पडले होते.






कोल्हापूर-हैदराबाद विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने अलायन्स एअरने बंगळूरलाही विमानसेवा सुरू केली होती. त्यामुळे या कंपनीकडून कोल्हापूर विमानतळावरून दोन मार्गांवर विमानसेवा सुरू होती. हैदराबाद विमानसेवा बंद होण्याअगोदर बंगळूर मार्गावरील विमान सेवाही सहा महिन्यांपूर्वीच बंद केली आहे. त्यामुळे कंपनीने कोल्हापुरातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे का? याची चर्चा सुरु झाली आहे. आता कोल्हापूर विमानतळावरून हैदराबाद मार्गावरील विमानसेवा बंद झाल्याने अलायन्स एअरची विमानसेवा पूर्ण बंद झाली आहे.


इंडिगो एअरलाईनची सध्या आठवड्यातून तीन दिवस सुरू असणारी विमानसेवा शुक्रवारपासून आठवड्यातून रविवार, सोमवार, बुधवार व शुक्रवार अशी चार दिवस सुरू राहणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या