Kolhapur News : कोल्हापूर मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपने रणनीतीवर चर्चा केली आहे. शिंदे गट आणि भाजपची जिल्हास्तरावर झालेली ही पहिलीच बैठक होती. बंडखोर सेना गट आणि भाजपने सरकार स्थापनेपूर्वी एकमेकांवर तोफ डागते होते. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सातत्याने टीका केली होती, पण दोघांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.
बैठकीनंतर शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, जिल्हा नियोजन, विकास परिषद आणि जिल्हास्तरीय समित्यांमधील रिक्त पदे भरण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. योग्य समन्वयाने ही पदे भरली जातील, याची काळजी घेतली जाईल.
नियोजन समितीसह तालुकापातळीवरील सर्व पदाधिकारी निवड प्रक्रिया येत्या पंधरा दिवसांत पूर्ण होईल, अशी माहितीही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आगामी निवडणुकांत युक्ती भक्कम ठेवण्यासाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना दोन्ही पक्षाच्या आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येथील हॉटेल पंचशीलमध्ये झाली. पालकमंत्री केसरकर आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री भाजपाचे चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील लवकरच हातात ‘ढाल-तलवार’ घेणार असल्याचा इशारा त्यांनी कळत न कळत दिला आहे. यावर पालकमंत्री म्हणाले, की झटपट निर्णय घेण्याची क्षमता असल्याने नेते आमच्या युतीकडे येत आहेत. मात्र नेत्यांची पार्श्वभूमीवर पाहून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. अनेक राजकीय पक्ष आम्हाला पाठींबा देण्याच्या तयारीत आहेत. बाळासाहेबांची शिवसेनेमधील 20 आमदार अस्वस्थ आहेत. ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे, यावर पालकमंत्री म्हणाले, की आमच्या धोरणानुसार एकमेकांचे कार्यकर्ते घ्यायचे नाहीत. मात्र जे बाहेरचे येणार आहेत तो त्यांचा स्वतंत्र प्रश्न आहे. तसेच विरोधक कोण काय म्हणतात त्याला आम्ही उत्तर देत राहणे योग्य नाही. ज्या लोकांची सत्ता गेली आहे.