ठाणे :  ठाणे पोलिसांनी सुमारे साडे 18 टन एफेड्रिन नावाचं ड्रग्ज पकडलं आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 2 हजार कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.


 

महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिलीच कारवाई आहे.  याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, यात एका नायजेरियन नागरिकाचाही समावेश आहे.

 

धक्कादायक म्हणजे हे ड्रग्ज बनवणारी कंपनी सोलापुरात असल्याचं उघड झालं आहे. सोलापुरातून हे ड्रग्ज अहमदाबादला पाठवण्यात येत होतं. त्यावेळी ठाण्याजवळ गुजरात रस्त्यावर हे ड्रग्ज पकडण्यात आलं.

 

याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून हे रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ही मुंबई - ठाण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे.