Shambhuraj Desai : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याबरोबरच, बालकांच्या काल गुणांना वाव मिळावा तसेच उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी, आरोग्याचा व शिक्षणाचा सातारा जिल्हा पॅटर्न ठाणे जिल्ह्यात राबविण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. तसेच या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील जिल्ह्यातील ग्रामीण भागातीलच नव्हे तर, पालिका क्षेत्रातील पालिकेच्या शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देखील समावेश करण्यात याव्या, अशा सूचना देखील देसाई यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक शनिवारी नियोजन भवनात झाली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई होते. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि निमंत्रित सदस्यांची उपस्थिती होती. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सन २०२४ - २५ च्या वार्षिक ९३८ कोटींचा अंतिम नियतव्यय मंजूर झाल्याची माहिती दिली. यावेळी ३० टक्के निधी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले कि, ठाणे जिल्ह्यातील ३० टक्के निधी प्राप्त झाला असला तरी, उर्वरित संपूर्ण निधी प्राप्त होईल त्यात एकही रुपया कट होणार नाही असे आश्वासन देखील दिले. तसेच मुख्यमंत्री एक्नातः शिंदे यांच्या निर्देशानुसार जो काही नियतव्यय शिक्षण आणि आरोग्यचा विभागाचा सगळा स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल मराठी शाळा यांच्यासाठी देण्यात आला असल्याचे देसाई यांनी सांगितले. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात देखील हा निधी शिक्षण आणि आरोग्य्साठी खर्च करण्याच्या सूचन दिल्या. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी जिल्ह्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा तर, प्राथमिक विभागाच्या १३ शाळा मॉडेल शाळा या उपक्रमांतर्गत निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.दरम्यान, महापलिका क्षेत्रांतील महानगर पालिकेच्या शाळा, नगर पालिकेच्या शाळा आणि आरोग्य केंद्र हे स्मार्ट आरोग्य केंद्र व मॉडेल शाळा उपक्रम राबविण्याचे निर्देश देखील पालकंमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मॉडेल शाळा
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मॉडेल शाळा करतांना, प्रयोग शाळा, स्मार्ट ग्रंथालय, मुला मुलींचे स्वतंत्र शौचालय, अपंगांसाठी रम आणि हन्दल, गणित आणि विज्ञान विषयासाठी लब, क्रीडा विकास, शाळांचे सौरउर्जीकर्ण आदी गोष्टींचा समाविष्ट शाळा मॉडेल करताना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी दिली.
रुग्णवाहिकांसाठी डॅशबोर्ड
जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र त्यांचे सुसूत्रीकरण करणारी एक नियोजित यंत्रणा नसल्याने रुग्णांना ऐनवेळी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नाही. यासाठी सर्व रुग्णवाहिकांना जीपीएस प्रणाली बंधनकारक करावी. तसेच रुग्णवाहिकांची आणि त्याच्या चालकांची सविस्तर माहिती असलेला एक डॅशबोर्ड तयार करण्यात यावा. त्या व्यवस्थेचे नियंत्रण जिल्हास्तरावर आणि स्थानिक प्रशासनाने ठेवावे. यामुळे रुग्णांना तातडीने रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल. असे यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी सांगितले.
योजना प्रभावीपणे राबवा
सरकारच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा यांसारख्या अनेक योजना सरकार राबवित आहेत. मात्र या योजनांचा लाभ किती जणांना आपण देणार आहोत.याबाबत सविस्तर माहिती घेणे महत्त्वाचे आहे. लाभार्थ्यांचे लक्ष्य ठरविले असल्यासच सर्व योजनांचा लाभ नागरिकांना देता येईल.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना १० हजार रुपये देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. यापार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यातील एमआयडीसी, खासगी कंपन्या यांच्या माध्यमातून आपण किती रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. याबाबत माहिती घ्यावी आणि त्यानुसार ही योजना तातडीने राबवावी अशा सूचना यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी केल्या. तसेच शासनाच्या मोठी लाभार्थी संख्या असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांची योजना निहाय टीम बनवावी आणि त्यानुसार काम करावे. असेही खासदार डॉ. शिंदे यांनी सूचित केले.
पुण्यानंतर ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक निधी
जिल्ह्याच्या विकासा करीता राज्य शासनाने तब्बल ९३८ काेटी रूपये मंजूर केलेले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २०० ते २२५ काेटी रूपयांचा जास्त यंदा ठाणे जिलह्यास प्राप्त झालेला आहे. राज्यात पुणेनंतर सर्वात जास्त निधी ठाणे जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. त्यापैकी ३० टक्के निधी प्राप्त झालेला असून त्यातून तत्काळ विकास कामे मंजूर करून घेण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या.
भिवंडी महापालिकेत लॅब टेक्निशियन, परिचारिका, फार्मासिस्ट, मिडवाईफ, कल्याण महापालिकेत ९० वैद्यकीय अधिकारी, ठाणे ग्रामीणमध्ये वर्ग १ ते वर्ग ४ पर्यंतची भरतीप्रक्रिया रखडली आहे, याकडे लक्ष वेधत आमदार निरंजन डावखरे यांनी तातडीने भरतीप्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली. त्यावेळी भिवंडी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी २९७ कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा प्रस्ताव टीसीएसकडे पाठविला असल्याचे स्पष्ट केले. कल्याण- डोंबिवली महापालिकेतील एमडी व एमबीबीएस डॉक्टरांची भरतीही प्रलंबित आहे, याकडे डावखरे यांनी लक्ष वेधल्यावर पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य विभागाची भरतीप्रक्रिया महिनाभरात तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
भिवंडी मनपातील पदवीधरांना न्याय मिळणार
भिवंडी महापालिकेत वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती करताना पदवीधरांऐवजी बारावी उत्तीर्णांना प्राधान्य देण्यात येणार आहे का, असा सवाल आ. डावखरे यांनी बैठकीत विचारला. तसेच या निर्णयामुळे पदवीधरांवर अन्याय होत असल्याकडे लक्ष वेधले. त्यावेळी २० ते २५ वर्षांपूर्वी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची बारावी अर्हता असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर या प्रश्नावर यशस्वी तोडगा काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यानी दिले.
कोविड केंद्रातील वैद्यकिय सामुग्री वापरा
कोविडचे काही बेडस या आधी दिखील वापरण्यात आले असून कोविडमध्ये विविध प्रकारचे हॉस्पिटल मध्ये लागणारे अनेक वस्तू वापरण्यात आले महानगरपालिकेमध्ये ती तशीच पडुन आहे. सामुग्रीचा उपयोग आरोग्य सेवा अद्ययावत करण्यासाठी करावा. अशी मागणी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यावर पालकमंत्र्यांनी हे उपयोगी साहित्य पुन्हा वापरात आणावे. असे निर्देश महापालिकाना दिले.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे पालकमंत्री शंभूराज यांच्यासाठी भर पावसात रेड कार्पेट वर ५ पोलीस गाड्यांचा उद्घाटन करण्यात आले आहे