TMC Budget: ठाणे महापालिका अर्थसंकल्प सादरीकरणात गोंधळ पाहायला मिळालाय. ठाणे महापालिकेचं ऑनलाइन अर्थसंकल्प सादरीकरण करत असल्यानं काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), भाजप (BJP) नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते विक्रांत चव्हाण (Vikrant Chavan) आणि भाजप नेते मिलिंद पाटणकर (Milind Patankar) यांच्याकडून ऑनलाइन सादरीकरणाला विरोध दर्शवलाय. सभागृहात सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित असताना, नगरसेवकांना आणि विरोधकांना ऑनलाइन उपस्थिती का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. तसेच अर्थसंकल्पाची कॉपीदेखील आधी पूरवली नसल्याचा विक्रांत चव्हाण यांचा आरोप आहे. मात्र, आयुक्त विपीन शर्मा यांनी गोंधळातच सादरीकरण सुरू केले  आहे. त्यामुळे विरोधकांना ऑनलाइन मिटिंग लेफ्ट केली आहे. 


दरम्यान, ठाणे महानगर पालिकेनं  2022-23 चा 3 हजार 299 कोटींचा मूळ अर्थसंकल्प आज आयुक्तांनी स्थायी समितीकडे सादर केला. कोणतीही करवाढ किंवा दरवाढ नसलेला वास्तववादी आणि काटकसरीचा अर्थसंकल्प हे या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्टय आहे. निवडणुकीचे वर्ष असल्यानं ठाणेकरांवर कोणतीही करवाढ नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन, संचारबंदी यांसारखे अनेक निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी, इतर जिल्ह्यांप्रमाणं ठाणे महापालिकेच्या स्तोत्रांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालंय. 


कोरोना संकटामुळं गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिकेचा यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज सादर केलाय. गेल्यावर्षी दोन हजार 755 कोटी 32 लाख रुपयांचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला होता.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha