दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो...


1. सचिन वाझेंची माफीचा साक्षीदार होण्याची तयारी, ईडीला पत्र लिहून माहिती देण्याची तयारी दर्शवली, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता


मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे (Sachin Vaze) माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे. सचिन वाझेनं या संदर्भात  ईडीला (ED) पाठवलं लेखी पत्र पाठवलं आहे.  मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्यास वाझेची तयारी असल्याची माहिती आहे. वाझेंच्या या अर्जसंदर्भात ईडी 14 फेब्रुवारीला कोर्टात आपली भूमिका मांडणार आहे.


2. तपास यंत्रणांवर कुणाचाही दबाव नाही, विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना पंतप्रधान मोदींचं उत्तर, लखीमपूर आणि पंजाब प्रकणावरही मौन सोडलं


3. 2018 ते 2020 दरम्यान देशात 25 हजार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी, कोरोना, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवलं


4. उत्तर प्रदेश विधानसभेच्या रणसंग्रामाचा आज पहिला टप्पा, 11 जिल्ह्यातल्या 58 जागांसाठी होणार मतदान, 6 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला


पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या देशात सुरू आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान  प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. 11 जिल्ह्यांतील 58 विधानसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश जागांवर मतदान होणार आहे. मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासू सुरू होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या भागात शेतकरी व जाट यांचे प्राबल्य आहे, त्यामुळे यावेळी शेतकरी आंदोलनामुळे येथील समीकरण गेल्या निवडणुकीपेक्षा काहीसे वेगळे मानले जात आहे. 


5. कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर शरद पवार हजर राहणार, 23 आणि 24 फेब्रुवारीला पवारांची मुंबईत साक्ष नोंदवली जाणार


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 10 फेब्रुवारी 2022 : गुरुवार



6. सरकारी कर्मचाऱ्यांची 23 आणि 24 फेब्रुवारीला संपाची हाक, निवृत्तीचं वय 60 वर्षे करावं आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र


7. मुंबई महापालिकेवर सात मार्चनंतर प्रशासक, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, निवडणूक एप्रिलअखेर किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता


8. मुंबईत लता मंगेशकरांच्या नावानं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची मंत्री उदय सामंत यांची माहिती


9. युक्रेन - रशिया तणाव वाढत असतानाच चीनच्या सीमेवर बड्या देशाचं शक्तीप्रदर्शन,  अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या वायूदलाच्या कसरती


10. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजला हरवून भारतानं मालिका खिशात घातली, 238 धावांचा पाठलाग करताना विंडीजचा डाव अवघ्या 193 धावांत गडगडला



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा