Temple Reopen : राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या निमित्तानं मंदिरं सजवण्यात आली असून भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी सर्व धार्मिक स्थळे उघडली गेली. मात्रं धार्मिक स्थळं उघडताना कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत. 

मुख्यमंत्री सहकुटुंब घेणार मुंबादेवीचं दर्शन 
आज घटस्थापनेनिमित्त महाराष्ट्रातील सर्व प्रार्थनास्थळे दर्शनासाठी नियमांचे पालन करून भाविकांसाठी उघडली जाणार आहेत. त्यानिमित्त माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर हे मुंबादेवीचे दर्शन सकाळी 8.30 वाजता घेणार आहेत.मुंबादेवी मंदिरात ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या भाविकांनाच प्रवेश असणार आहे.यासाठी मुंबादेवी मंदिराच्या वेबसाईट वर बुकिंग करता येईल.आजपासून नवरात्री उत्सव देखील सुरू होणार आहे.यामुळे या मंदिरात मोठ्या प्रमाणत गर्दी होण्याची शक्यता आहे.यासाठी इथे रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बरोबर कोरोना नियमांचे पालन भाविकांकडून करून घेण्यास ही नियमावली करण्यात आली आहे. 

तुळजाभवानी मंदिरात उत्सव काळात रोज 15 हजार भाविकांनाच प्रवेश

उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजापूर (Tuljapur) मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत लेखी आदेश काढले आहेत. शारदीय नवरात्रोत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून या उत्सव काळात दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही. देवीचे महंत, सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे कुलाचार विधी संपन्न होणार आहेत. याबाबतचा जिल्हाधिकारी यांचा आदेश माहिती आणि जनसंपर्क कार्यालयानं कळविला आहे. परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासांच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे. यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असून हॉटेल, दुकानात असलेल्या कर्मचारी यांचे 2 डोस झालेले असून त्याची यादी प्रशासनाला कळवावी लागणार आहे. घटस्थापनेपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र त्यापूर्वीच हजारोंच्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारवर ''आईसाहेब" असे लिहिण्यात आले आहे. घटस्थापनेआधी राज्यभरातून विविध भागातून तरुण आई भवानीची ज्योत घेऊन जाण्यासाठी तुळजापुरात येत असतात. आजही मोठ्या संख्येने तरुण आई भवानीची ही ज्योत घेऊन जाण्यासाठी मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. 

विठ्ठल मंदिर झाले भाविकांसाठी खुले, विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट 

आज शारदीय नवरात्राला सुरुवात होत असताना गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली होत असून घटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुलांची सेवा दिली असून आजच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या जवळपास अडीच टन फुलांचा आणि तुळशीपत्राचा वापर केला आहे . यामध्ये लक्षावधी तुळशीच्या पानांसह झेंडू , गुलाब, अष्टर , शेवंती , जरबेरा , कागडा , कामिनी , ग्लॅडीओ या फुलांचा वापर करण्यात आला आहे . विठुरायाच्या गाभारा त्याच्या लाडक्या तुळशीपत्राने भरून गेला असून रुक्मिणी मातेच्या मागे शेवंतीच्या फुलाचे पडदे करण्यात आले आहेत . मंदिरात विविध रंगी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्याने आज विठ्ठल भक्तांना आपल्या  लाडक्या  विठुरायाचे सावळे रूप आकर्षक फुल सजावटीमध्ये घेता येणार आहे . या रंगीबेरंगी सुगंधी फुलांमुळे विठ्ठल मंदिर सुवासाने दरवळून निघाले आहे .

शेगावचं गजानन मंदिर ऑनलाइन पास काढलेल्या भक्तांसाठी खुलं

विदर्भाची पंढरी असलेल्या व राज्यातील प्रमुख देवस्थानांपैकी एक असलेलं बुलडाण्यातील शेगावचं संत गजानन महाराज मंदिर आज सकाळी 5 वाजेपासून ऑनलाइन पास काढलेल्या भक्तांसाठी खुलं करण्यात आलं आहे. आज गुरुवार असल्याने व पहिला दिवस असल्याने तीन दिवस आधीच आजच ऑनलाइन दर्शनाचं बुकिंग हाऊसफुल झालं आहे. त्यामुळे भक्तांनी निर्धारित वेळेत दर्शनासाठी पोहचणे पसंत केलं. सकाळी 4.30 वाजेपासूनच भक्त रांगेत उभे आहेत.  

राज्यभरातील मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी आजपासून खुली केली जाणार आहे. त्याचबरोबर आजपासून नवरात्री उत्सवाला देखील सुरुवात होणार आहे. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवले आहे रोषणाई केली जाते तब्बल दोन वर्षांनंतर मंदिरामध्ये जाऊन भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहेत. पुण्यातील सारसबागेच्या समोर असलेल्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये सुंदर सजावट करण्यात आलेली आहे आणि खास व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून भाविकांना सहजपणे मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेता येईल. 

उद्यापासून आदिशक्तीचा जागर सुरू होतोय. घटस्थापनापासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होईल. मात्र त्यापूर्वीच हजारोंच्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारवर ''आईसाहेब" असे लिहिण्यात आले आहे. घटस्थापनेआधी राज्यभरातून विविध भागातून तरुण आई भवानीची ज्योत घेऊन जाण्यासाठी तुळजापुरात येत असतात. आज ही मोठ्या संख्येने तरुण आई भवानीची ही ज्योत घेऊन जाण्यासाठी मंदिर परिसरात दाखल झाले आहेत.