अहमदनगर : आपल्या आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षकांच्या पगारात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत शुक्रवारी घेण्यात आला. तसंच ज्या शिक्षकांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाहीत, त्यांच्या सुविधा काढून घेणार असल्याचा ठरावही मांडण्यात आला.
अहमदनगर जिल्हा परिषदेत शनिवारी आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सर्वेक्षणानुसार जे कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील, अशा शिक्षकांच्या वेतनातील तीस टक्के वेतन संबंधित शिक्षकांच्या आई-वडिलांच्या खात्यावर जमा करण्याचा अनोखा निर्णय घेण्यात आला आहे.
तसंच पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क, शाळा संलग्न शुल्क अहमदनगर जिल्हा परिषद भरणार आहे. ज्या शिक्षकांची मुले जिल्हा परिषद शाळेत नाहीत, त्यांचे समुपदेशन करुन त्यांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केले जाईल. पुढील शैक्षणिक वर्षात जे शिक्षक असे करणार नाहीत, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घेण्यावरही समितीत निर्णय घेण्यात आला.
सोबतच जिल्ह्यातील वीस शाळा खोल्यांसाठी खासदार, आमदारांना निधी देण्याची विनंती करण्याचा ठराव घेण्यात आला.
आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या शिक्षकांच्या पगारात कपात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Oct 2017 08:51 AM (IST)
अहमदनगर जिल्हा परिषदेत शनिवारी आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सर्वेक्षणानुसार जे कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील, अशा शिक्षकांच्या वेतनातील तीस टक्के वेतन संबंधित शिक्षकांच्या आई-वडिलांच्या खात्यावर जमा करण्याचा अनोखा निर्णय घेण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -