तहसीलदार विनोद रणनवरे यांनी वाळू वाहतुकीचा डंपर थांबवण्याची सूचना दिली. पण डंपर चालक थांबला नाही. दुचाकीवरून तहसीलदारांनी डंपरचा पाठलाग केला.
शहराच्या मध्यवर्ती भागातून डंपर चालक सुसाट निघाला. तहसीलदार पाठलाग करत असल्याचं पाहून त्याने चालत्या डंपरमधून वाळू टाकायला सुरुवात केली. पूर्ण डंपर रिकामा झाला. पण डंपर चालक थांबला नाही.
शहराच्या बाहेर त्याने पलायन केलं. डंपरला नंबर प्लेटही नव्हती. अखेर तहसीलदारांना मागे फिरावं लागलं. रस्त्यावर पडलेली वाळू पोलिसांनी रात्रभर बाजूला सारली.
बातमीचा व्हिडीओ :