Tadoba Viral Video :  नागपंचमीला (Nagpanchami) चक्क वाघोबाने नागाचा मान राखला असं म्हणावं असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media)  व्हायरल झालाय. ताडोबाच्या (Tadoba)  जंगलात सुमारे अर्धा तास वाघ आणि कोब्राचा आगळावेगळा सामना रंगला. वाघासमोर एक कोब्रा सुमारे अर्धा तास फणा काढून अगदी समोरासमोर तशाच तोऱ्यात बसला होता.. त्यामुळे जंगलाचा राजा वाघ आणि त्याला न घाबरणारा कोब्रा  सुमारे अर्धा तास एकमेकांच्या समोरासमोर होते. ताडोबातील बेलारा बफर झोनमध्ये काल संध्याकाळी ही घटना घडली. वाघ आणि कोब्रा आमने-सामने असल्याचे हे दृश्य नागपुरातील वन्यजीवप्रेमी नितीन घाटे यांनी चित्रित केले आहे.


व्हिडीओमध्ये माकड आणि किंग कोबरा आमनेसामने दिसत आहे.कोणीच कोणावर हल्ला करत नाही. मात्र  दोघांपैकी एकही मागे हटण्यास तयार नाही. दोघेही एकमेकांवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या पद्धतीने झुंज देत असल्याचा थरार प्रथमच पाहण्यास मिळत आहे. दोघांमधील या लढाईचा शेवट काय होतो, हे पाहण्याची उत्सुक्ता व्हिडिओ दरम्यान लागते. 


काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये? 


 दोघांमध्ये कोण वर्चस्व गाजवते, कोणाचा विजय होतो, हे पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला किंग कोबरा आणि वाघ एकमेकांच्या समोर दिसतात . एका  मिनिटाचा हा व्हिडीओ आहे.   सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्याला लाईक अन् कॉमेंट केल्या आहेत.