Swaraj Express : स्वराज एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला आहे. धावत्या रेल्वेमध्ये या तरुणीनं गळफास घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरती कुमारी मिथिलेश पाल ( वय 20)  असे मृत तरुणीचे नाव असून ती बिहार मधील रहिवाशी असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी दिली. 


आरती हिचा मृतदेह टॉयलेटमध्ये आढळल्यानंतर प्रवाशांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला कळवले. त्यानंतर डहाणू रोड स्थानकात ही रेल्वे थांबवण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या तरूणीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.   


रविवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान पश्चिम रेल्वेकडे स्वराज एक्स्प्रेसबाबत एक कॉल आला. "एक वीस वर्षीय मुलगी वॉशरुमला गेली होती पण बराच वेळपर्यंत ती परतलेली नाही, अशी माहिती या कॉलवरून देण्यात आली. त्यानंतर या गाडीला डहाणू रोड स्थानकात दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी विशेष थांबा देण्यात आला. 


रेल्वे डहाणू येथे थांबल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ती तरुणी ज्या डब्यात होती त्या डब्यातील बंद असलेल्या वॉशरुमचं लॅच उघडलं. त्यावेळी संबंधीत तरुणी वॉशरुममध्ये पडलेली आढळली. तिच्या गळ्याला एक कपडा गुंडाळलेला होता. यानंतर तिला तातडीनं बाहेर काढत येथील डहाणू कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पालघर रेल्वे पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.


पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहतीनुसार मृत तरूकडे तिचे आधार कार्ड मिळाले असून आरती कुमार असे मृत तरूणीचे नाव आहे. ती मुळची बिहारचा रहिवासी आहे. ही आत्महत्या आहे की तिची हत्या करण्यात आली, की अपघात  होता. शिवाय ती एकटीच प्रवास करत होती का? तिच्यासोबत अजून कोण होते का? याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.   


महत्वाच्या बातम्या


Ahmednagar: शेततळ्यात बुडून सख्या बहिण भावाचा मृत्यू, अहमदनगर येथील घटनेने हळहळ 


Dombivli : पाणी टंचाईने घेतला जीव! डोंबिवलीत खदानीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू