पंढरपूर : मोहिते पाटील (mohite patil) यांच्या माळशिरस (Malshiras nagar panchayat) नगरपंचायतमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपला दणका दिला आहे. गटबाजीमुळे बहुमत असूनही राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली आहे.मोहिते पाटलांच्या माळशिरस मध्ये सत्तेचा नवा फार्मुला समोर आला असून भाजपला बहुमत असूनही गटबाजीमुळे बंडखोर भाजप आणि राष्ट्रवादी सत्तेत आली आहे. भाजपमधील गटबाजी थांबवण्यात मोहिते पाटील यांना अपयश आल्याने भाजप बंडखोर आप्पासाहेब देशमुख नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीचे शिवाजी देशमुख उपनगराध्यक्ष पदी विजयी झाले.  


आता कोणीही या आघाडीत हस्तक्षेप करू शकणार नसून पाच वर्षे भाजप राष्ट्रवादी आघाडी एकत्रित कारभार करणार असल्याचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी सांगितले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी राज्यात एकत्रित येण्याबाबत चर्चा सुरु असतात. अशात मोहिते पाटील यांच्या माळशिरसमध्ये भाजप-राष्ट्रवादी युती सत्तेत आली आहे. 


त्यामुळे माळशिरस नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने भाजपने गुलाल खेळल्याचे राज्यात एक अजबच चित्र पहायला मिळालेय. यावर बोलताना भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही घटना नगरसेवकांच्या गैरसमजातून झाली आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ देणार नाही असं मत व्यक्त केलं.


माळशिरस नगरपंचायतीतील पक्षीय बलाबल


भाजपा – 10
राष्ट्रवादी – 2
इतर व अपक्ष – 5



इतर महत्वाच्या बातम्या 


महाआयटीत 25 हजार कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप, 25 हजार कोटींचा घोटाळा कसा? BJP चा सवाल


Amol Kale : महाआयटी घोटाळा प्रकरण: संजय राऊतांनी आरोप केलेल्या अमोल काळेंनी म्हटलं, देश सोडून...