Raju Shetti on Sharad Pawar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मनात जो राग आहे, असंतोष आहे त्याला वाट करुन देण्यासाठी मी हुंकार यांत्रा घेऊन आलो असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी म्हणाले. शरद पवार ऊस उत्पादक शेतकऱ्याला आळशी म्हणाले, म्हणून मला राग आला. महाराष्ट्राचे अर्थकारण ऊस उत्पादनामुळे स्थिर झाले आहे. त्याच ऊस उत्पादकांना जर तुम्ही आळशी म्हणत असाल तर राजू शेट्टी सहन करणार नाही असेही ते म्हणाले. तसेच ईडी शरद पवार यांच्या ताब्यात असू दे नाहीतर नरेंद्र मोदी यांच्या ताब्यात असू दे आम्ही ईडीला घाबरत नाही असेही शेट्टी म्हणाले.


दरम्यान, मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तर भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार नाही असेही शेट्टी म्हणाले. केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल अ‍ॅक्ट (1966 अ) नुसार शेतकर्‍यांना उसाची एफआरपी 14 दिवसाच्या आत मिळण्याचा हक्क कायद्याने दिलेला आहे. तरीही एकरकमी एफआरपी दिली जात नाही. आता तर एफआरपीचे दोन तुकडे केले आहेत. शरद पवार यांनी भूमिका बदलली आहे, त्यांनी तुकड्यात एफआरपी देण्याचे समर्थन केले असल्याचे शेट्टी म्हणाले. तुम्ही म्हणालेत की ऊस हे आळशी शेतकऱ्याचे पीक आहे. पवार साहेब तुम्ही खरोखरच खोट बोलताय की शेती समजूनच घेतली नाही याबदद्ल मला संशय येत असल्याचा टोलाही शेट्टी यांनी लगावला.


मी सध्या दिवसा वीज मागत आहे. संविधानाने समान हक्क दिला आहे,. नैसर्गीक साधनसंपत्तीवर सगळ्यांचा समान हक्क आहे. त्यामुळे दिवसा वीज द्या अशी मागणी करत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले. ग्रामीण भागातील तमाम शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळावी अशी मागणी आहे. त्यामुळे 1 मे ला गावसभेत शेतकऱ्याला दिवसा वीज मिळीली पाहिजे असा ठराव करा. तो ठराव माझ्याकडे द्या ते सर्व ठराव कोर्टात मी सादर करणार असल्याच शेट्टी यांनी सांगितले. न्यायालयीन लढाईही लढणार आहे. समितीचा निकाल काहीही लागू दे आपण रस्त्यावरची आणि न्यायालयीन या दोन्ही लढाई लढू असे शेट्टी यांनी सांगितले.


सगळ्याच पिकांना हमीभाव देणं बंधनकारक केलं असते तर शेतकरी उसाकडे वळला नसता. तुम्ही 10 वर्षात हे धोरण राबवले असते तर अतिरीक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला नसता असेही राजू शेट्टी शरद पवार यांना उद्देशून म्हणाले. सध्या देशात डाळींची, खाद्य तेलाची टंचाई आहे. 10 वर्ष संधी मिळून तुम्हाला काही करता आले नाही. शेतकऱ्याला नावे कशाला ठेवता, अपयश तुमचे आहे असेही शेट्टी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: