Raju Shetti : सरकारी योजनेतील व्यवस्थेत त्रुटी असल्यानं जनतेच्या पैशांचा अपव्यय होत आहे. व्यवस्थेतील त्रुटीमुळे पात्र व्यक्तिंना फटका बसत असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केले. मी माजी लोकप्रतिनिधी असल्याने PM किसान योजनेसाठी पात्र होत नाही. मी अर्ज केला नसतानाही माझ्या खात्यावर PM किसान योजनेतून 12 हजार रुपये जमा झाले होते. ते मी तहसीलदारांना माहिती देऊन परत केले. तरीही अजून माझ्या खात्यावर 2 हजार रुपये जमा झाल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. त्यामुळे या त्रुटींचा फटका पात्र व्यक्तिला बसत असल्याचे शेट्टी म्हणाले.
बार्शी तालुक्यातील जवळगांव या ठिकाणी बळीराजा हुंकार यात्रेची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी राजू शेट्टी बोलत होते. अतिरिक्त ऊसामुळे , काटामारी , उसतोडणी मधील खंडणी, पाण्याची अपुरी व्यवस्था , अवेळी मिळणारी वीज , वेळेवर न मिळणारी एफआरपी यामुळं परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असल्याचे शेट्टी म्हणाले. यावेळी शेट्टी यांनी सरकारवर देखील जोरगार निशाणा लगावला.
शेतकऱ्यांकडून रुपयाला घेतलेल्या मालाची किंमत अदानीचया गोदामात गेल्यावर पाचपट वाढते. अंबानीच्या मॉलमध्ये गेल्यावर दहापट वाढते. उद्योगपतींना निवडणुकीत केलेल्या मदतीच्या बदली शेतकऱ्यांचा बळी का घेता? असा सवाल देखील शेट्टी यांनी उपस्थित केला. राज्यकर्त्यांनो शेतकरी म्हणजे तुमच्या गोठ्यातील बैल आहे का? राजकीय महत्वकांक्षेपोटी शेतकऱ्यांच्या खांद्यावर वाट्टेल तितका बोजा का टाकता असे सवाल देखील राजू शेट्टी यांनी उपस्थित केले.
शेतकतऱ्यांना न्याय, हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सध्या राज्यभर हुंकार यांत्रा सुरु आहे. 17 एप्रिलपासून या यात्रेची सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान राजू शेट्टींनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या लावून धरल्या आहेत. यामध्ये शेती पिकाला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने त्वरीत कायदा करावा, शेतीला दिवसा दहा तास वीज द्या, एफआरपीच्या पाडलेल्या तुकड्यांचा निर्णय त्वरीत मागे घेऊन एकरकमी एफआरपी द्या, शेतीसाठी चालू असलेलं भारनियमन त्वरीत मागे ग्याव, रासायनिक खतांची दरवाढ त्वरीत कमी करावी आणि भूमी अधिग्रहण कायद्यांची केलेली मोडतोड तातडीन मागे घ्यावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची हुंकार यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान या विविध मागण्या केल्या जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: