Kolhapur: शेतकऱ्यांना दिवसा दहा तास शेतीसाठी वीज मिळाली या मागणीसाठी येथील महावितरण कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनाकडं महावितरणच्या अधिकाऱ्यानं दुर्लक्ष केल्यानं अज्ञात शेतकऱ्यांनी गुरुवारी कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचं कार्यालय पेटवून दिलं होत. यातच आज कोल्हापूरच्या (Kolhapur) इचलकरंजी (Ichalkaranji) येथील महावितरणच्या अधिकाऱ्याच्या टेबलावर साप सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेमुळं महावितरण ऑफिसमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. 


ग्रामीण भागात शेतीसाठी रात्रीची वीज पुरवली जाते. परंतु, आम्हाला दिवसा वीज मिळाली, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु, महावितरण अधिकाऱ्यांनी दिवसा वीज देण्यास नकार दिला. त्यानंतर शेतकऱ्यांनी इचलकरंजी येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर साप सोडल्याची माहिती समोर येत आहे.  


शेतीसाठी दिवसा 10 तास पूर्ण दाबानं वीजपुरवठा करावा आणि विज तोडणी थांबवावी. तसेच सक्तिचे विजबिल आणि शेतकऱ्यावर जाचकपणे लावलेले वीजबील तात्काळ रद्य करावे, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करीत आहेत. 


शेती व शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असुनही शेतीसाठी लागणाऱ्या प्राथमिक गरजेसाठीही शेतकऱ्यांना वेठीस धरलं जाते. शेतीसाठी रात्री अपरात्री पुरवली जाणारी वीज ही शेतकऱ्याच्या जीवावर बेतणारी आहे. रात्री हींस्र स्वापदे तसेच रानडुकरे व सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर हा शेतकऱ्याचा जीवितावर बेतत आहे. त्यांच्या हल्ल्यामुळे अनेक शेतकरी प्राणाला मुकले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्याची कुटुंब अनाथ झाले. यातच वितरण कंपनीकडून कमी दाबाचा विजपुरवठा केला जातोय. अंधारात शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत आहेत. रात्री पिकाला पाणी शेतकरी जीवावर उधार होऊन असतो. या अनुषंगानं राजू शेट्टी हे कोल्हापूर येथे विद्युत वितरण कंपनीसमोर धरणे धरून बसलेले आहेत.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha