Beed : घरातील तीन बालकांना आणि आईला जेवणातून विषबाधा झाल्याची घटना बीडच्या (Beed) अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील बागझरी येथे घडली आहे. रात्रीच्या जेवणामधून झालेल्या विषबाधेमुळे तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर या बालकांची आई मृत्यूशी झुंज देत आहे. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या कुटुंबातील ३ बालकांसह पत्नी अशा चार सदस्यांना विषबाधा झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
साधना (वय 6), श्रावणी (वय 4), नारायण (8 महिने) अशी मृत बालकांची नावे आहेत. तर, पत्नी भाग्यश्री (वय 28) यांची देखील प्रकृती चिंताजनक आहे. रात्रीच्या जेवणानंतर ही विषबाधा झाली असल्याचा संशय काशीनाथ धारासुरे यांनी व्यक्त केला. परंतु, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Geranium farming : कशी कराल जिरेनियमची शेती, जिरेनियम लागवडीचे तंत्र नेमकं काय?
- Pune Farming : विनामातीची, हवेत पिकणारी अनोखी शेती; लोणावळ्यातील प्रयोगाची होतेय चर्चा
- Sambhaji Raje Chhatrapati Protest : मराठा आरक्षणासाठी आजपासून संभाजीराजेंचा एल्गार, मुंबईत आमरण उपोषण
- Yashwant Jadhav : 24 तास उलटले तरी यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरूच, रात्रभर शिवसैनिकांची निदर्शने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha