सिंधुदुर्ग : राज्यातल्या राजकारणातलं प्रभावशाली व्यक्तीमत्त्व आता पुस्तकीरुपातून समोर येणार आहे. शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिणार आहेत. नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.


“माझे वडील नारायण राणे हे आत्मचरीत्र लिहित असून लवकरच त्याचे प्रकाशन होणार आहे. तर अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”, अशा प्रकारचं ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. त्यामुळेच नारायण राणेंच्या आत्मचरित्रात नेमकं काय असेल याची उत्त्सुकता सर्वांच लागली आहे.

EXCLUSIVE | VIDEO | आनंद दिघेंच्या मृत्यूला बाळासाहेब जबाबदार, निलेश राणेंचा सनसनाटी आरोप | रत्नागिरी | एबीपी माझा



आता नारायण राणे यांच्या आत्मचरीत्रात नेमका काय उल्लेख असेल, शिवसेनेबाबत ते आत्मचरीत्रात काय लिहिणार, आत्मचरीत्रात मोठ्या नेत्यांबाबत काही गौप्यस्फोट करणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

नारायण राणेंनी 1972 मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोंबर 1999 या काळात नारायण राणेंनी महाराष्ट्रराज्याचं मुख्यंत्रीपद भुषवलं होतं. आघाडीची सत्ता असताना 2005 साली त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली.