महामार्गाची कामं इतर ठिकाणी सिमेंटमध्ये होत असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र डांबराच्या साहाय्यानं रस्ता तयार केला जात असल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी रस्ताच खोदला आहे. शिवसैनिकांनी सुरू असलेल्या माती व मुरुमीकरणाच्या कामावर चक्क ट्रॅक्टर वरील रोटावेटरने रस्ता उखडला आणि चालू असलेले काम बंद पाडले आहे.
VIDEO | यवतमाळ-दारव्हा गावातला महामार्ग शिवसैनिकांनी खोदला, सिमेंटऐवजी डांबर वापरलं जात असल्याचा आरोप | एबीपी माझा
दिग्रस ते मूर्तिजापूर दरम्यान होत असलेले हे रस्त्याचे काम सिमेंटमध्ये करावे अन्यथा रस्ता होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे.