जळगाव : प्रेमविवाह करून आलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना जळगांव जिल्हयातील धरण गाव तालुक्यतील पाळधी या गावात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत विवाहितेचा नवऱ्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याच संशय मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.


जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील तरुण प्रशांत पाटील या तरुणाने गावातीलच एका तेवीस वर्षीय प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधातून दोघांनी पंधरा दिवसापूर्वी मंदिरात जाऊन विवाह केला होता. विवाहानंतर काही दिवसापूर्वी त्यांनी पोलिसात आपण विवाह केल्याचं सांगत पाळधी गावात संसार सुरू केला होता. मात्र त्यांचा हा संसार सुरू होण्याला आठ दिवस पूर्ण होत नाही. तो पर्यंत सदर विवाहितेचा नग्न अवस्थेत मृतदेह तिच्याच घरात आढळून आल्याने संपूर्ण पाळधी गावात खळबळ मिळाली आहे.


याबाबत मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी सदर विवाहितेवर तिच्या नवऱ्याच्या मित्रांनी बलात्कार केल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्याला सासरच्या लोकांची साथ असल्याच म्हटलं आहे. काल 31 डिसेंबरच्या रात्री मयत विवाहितेसह तिचा पती आणि त्याचे मित्र देखील हजर होते. सकाळी त्यांच्यातील एक मित्र मुलीच्या नातेवाईकांना घेण्यासाठी आला होता. मुलीची तब्ब्येत गंभीर असल्याच त्याने या वेळी मुलीच्या नातेवाईकांना सांगितलं होतं.


मुलीचे नातेवाईक सकाळी तिला भेटण्यासाठी गेले असता सदर विवाहिता नग्न अवस्थेत घरात मृत आढळून आल्याच त्यांना पाहायला मिळाले होते. तर विवाहितेचा नवरा झोपलेल्या अवस्थेत असल्याचा त्यांना आढळून आल्याच म्हटलं आहे. विवाहिता नग्न अवस्थेत आढळून आल्याने आणि रात्री तिच्या नवऱ्याचं मित्र घरात असल्याने बलात्काराचा संशय मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. आरोपी ना अटक करून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे


या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नसून पोस्टमार्टेम रिपोर्टनंतर त्याच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याच म्हटलं आहे. घटनास्थळी विवाहितेचा नवरा हा अर्धवट बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने विवाहितेच्या नवऱ्याला इस्पितळात दाखल केले असून तो पूर्णपणे शुद्धीवर आल्यावर काय तो खुलासा होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.