सांगली : हैद्राबादमधील 'भारत बायोटेकने कोरोना प्रतिबंधक म्हणून विकसित केलेल्या 'COVAXIN' या लसीच्या तिसऱ्या चाचणीसाठी देशातील अग्रगण्य 26 मेडिकल हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. या 26 हॉस्पिटलमध्ये इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा समावेश आहे. या हॉस्पिटलला 1 हजार लसी देण्यात आल्या असून 30 वर्षावरील व्यक्ती, महिला आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांची या लसीची चाचणी देण्यासाठी निवड करण्यात येत आहे.


भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड हैदराबाद , नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी पुणे, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त प्रयत्नमधुन ही भारतीय बनावटीची लस तयार करण्यात आलीय. या लसीच्या दोन चाचणी यशस्वी झाल्या असून अंतिम चाचणी सुरुय. या तिसऱ्या टप्प्यात 25 हजार 800 स्वयंसेवकांना ही लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत अनेकांना ही लस देण्यात आली असून त्यातुन कुणालाही त्रास झालेला नाही. खासकरून या लसीमुळे अँटीबीडीज शरीरात वाढत असून त्या सहा महिने ते वर्षभर कोरोनपासून संरक्षण मिळू शकणार असल्याचा दावा डॉक्टराकडून करण्यात आलाय. प्रकाश हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल कर्मचारी आणि स्वयंसेवकांना ही लस मोफत देण्यात येत आहे.


येत्या आठवडाभरात एक हजार स्वयंसेवकांना 'COVAXIN'चे लसीकरण चाचणी करून त्याचा अहवाल भारत बायोटेकला पाठवण्यात येणार आहे. ही लस सहा ते आठ अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठेवणे आवश्यक असून तशी यंत्रणा प्रकाश हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आली आहे.



हैद्राबादमधील भारत बायोटेकमध्ये विकसित करण्यात आलेली लस इस्लामपूरमध्ये 225 जणांना चाचणी स्वरूपात देण्यात आली आहे. सांगलीसाठी एक हजार लसी आल्या आहेत. या लसीच्या तिसऱ्या टप्यातील लसीकरणाच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. या अंतर्गत इस्लामपूरमधील प्रकाश मेडिकल सेंटरमध्ये हे लसीकरण करण्यात आले असून यास राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मान्यता दिली आहे.


येत्या आठवड्यामध्ये एक हजार स्वयंसेवकांना 'COVAXIN'चे लसीकरण करून त्याचा अहवाल भारत बायोटेकला पाठवण्यात येणार आहे. भारतातील तापमान लक्षात घेऊन आणि किमान 2 महिने या लसीची गुणवत्ता टिकेल या दृष्टीने या लसीची निर्मिती करण्यात आली आहे.