मुंबई : फरारी ड्रग्ज माफिया ललित पाटील (Sasoon Drugs Case)  याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे (dada Bhuse) यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. त्या आधी पुण्यातील आमदार रविंद्र धंगेकरांनीही ललित पाटीलच्या पळण्यामागे राज्यातील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता. ललित पाटील हा काही दिवसांपूर्वी ससूनमधून फरारी झाला होता. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 


आधी आमदार धंगेकरांचा आरोप 


ड्रग्ज माफिया ललित पाटील (Sasoon Hospital Drug Racket) पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची भेट घेऊन ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती मागितली. मात्र डीननी ही माहिती देण्यास नकार दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी डीनच्या केबिनमध्येच ठिय्या मांडला. डीननी माहिती न दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनच्या कारभाराबाबत सुनावले. ललित पाटीलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.


रवींद्र धंगेकरांचा आरोप काय? 


दरम्यान, पुण्यातील कसबा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठा आरोप केला होता. ड्रग्स माफिया ललित पाटील (Sasoon Hospital Drug Racket) पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता. मात्र यावेळी त्यांनी कोणत्याही मंत्र्याचं नाव घेतलं नव्हतं. पण ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी आता मंत्री दादा भुसे यांचं नाव घेतल्याने याप्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.


ललित पाटील फरार होऊन नऊ दिवस झाल्यानंतर देखील त्याच्यावर कुठल्या आजारासाठी उपचार सुरु होते आणि त्याच्यावर कोण डॉक्टर उपचार करत होते? हे ससूनकडून जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे ससूनच्या कारभारावर चांगलीच टीका केली जात आहे. 


ललित पाटीलच्या भावाला अयोध्येत पकडलं


ड्रग माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील आयोध्येजवळून ताब्यात घेतलं आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून निसटल्यानंतर भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेदेखील पसार झाले होते. भूषण पाटील हा केमिकल इंजिनियर आहे. त्याने मेफेड्रॉन तयार करण्याचं प्रशिक्षण घेतल्यावर तो नाशिक एमआयडीसीमध्ये मेफेड्रॉन तयार करण्याचं काम करत होता.  भूषण पाटील मेफेड्रॉन तयार करायचा, अभिषेक बलकवडे त्याची वाहतूक करायचा तर ललित पाटील प्रत्यक्ष डील करायचा.


ही बातमी वाचा: