यावेळी कर्जत पोलीस स्टेशन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, सुरेश लाड यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र कोर्टाने हा अर्ज फेटाळला होता.
काय आहे प्रकरण?
आमदार सुरेश लाड यांनी रिलायन्स पाईपलाईन संदर्भातल्या बैठकीत भूसपांदन उपजिल्हाधिकाऱ्यांना मारहाण केली. 16 ऑगस्टला याबाबतचा व्हिडीओ समोर आला होता. मात्र आपण मारहाण केली नसल्याचा दावा लाड यांनी केला होता. पण माध्यमांच्या हाती लागलेल्या दृश्यांमध्ये उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना आमदार सुरेश लाड मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत होतं.